शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणे यांनी ‘त्या’ वक्त व्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 23:30 IST

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध केलेले वक्तव्य हे संतापजनक आणि निंदनीय आहे. त्यामुळेच वाद चिघळू न देता राणे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

ठळक मुद्देअंगावर आल्यास जशास तसे उत्तर ठाणे भाजपाचा शिवसैनिकांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध केलेले वक्तव्य हे संतापजनक आणि निंदनीय आहे. त्यामुळेच वाद चिघळू न देता राणे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्ता हा संयमी आहे. परंतू, आमच्या अंगावर आल्यास जशास तसे उत्तर देण्याची धमक भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे, असा इशारा भाजपचे आमदार तथा ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिला आहे.केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध केलेले वक्तव्य हे संतापजनक आणि निंदनीय आहे. महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. आतापर्यंत कोणीही मुख्यमंत्र्यांवर असे वक्तव्य केले नव्हते. ते महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारे आहे. कोविड परिस्थिती लक्षात घेऊन वाद चिघळू न देता, राणे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.ठाण्यातील शिवसैनिकांच्या एका टोळक्याने भाजपच्या खोपट कार्यालयावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र,तो यशस्वी झाला नाही. याच पार्श्वभूमीवर डावखरे म्हणाले, भाजचा कार्यकर्ता हा कोणत्याही परिस्थितीमध्ये संयम सोडणार नाही. परंतू, कोणीही कार्यालयावर किंवा कोणाच्याही घरावर जर हल्ला करणार असेल तर तेही खपवून घेतले जाणार नाही. भाजपचा कार्यकर्ता हा कार्यालयाच्या संरक्षणासाठी मागे हटणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी शहर अध्यक्ष अ‍ॅड. संदीप लेले, नगरसेवक नारायण पवार, सिताराम राणे आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र