शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्त्यांच्या काठ्या घेतल्या ताब्यात; पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 08:00 IST

भाजपचे ठाणे शहर(जिल्हा)प्रमुख आमदार निरंजन डावखरे यांनी संरक्षणाची मागणी करताच पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी  तत्काळ या ठिकाणी राज्य राखीव दल पोलिसांची कुमक तैनात केली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्यानंतर मुंबई आणि नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर ठाण्यातही त्याचे पडसाद उमटले. मंगळवारी काही शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खोपट येथील कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, राबोडी पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. शिवसैनिकांना परतविण्यासाठी काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी हातात काठ्या घेऊन कार्यालयाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपायुक्त अंबुरे यांनी या काठ्या ताब्यात घेतल्या.

   भाजपचे ठाणे शहर(जिल्हा)प्रमुख आमदार निरंजन डावखरे यांनी संरक्षणाची मागणी करताच पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी तत्काळ या ठिकाणी राज्य राखीव दल पोलिसांची कुमक तैनात केली. भाजप कार्यालयावर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन राबोडी आणि ठाणेनगर पोलिसांनी भाजप कार्यालयावर मंगळवारी सकाळी बंदोबस्त तैनात केला होता. त्याच दरम्यान दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खोपट येथील कार्यालयावर एक दगड आणि शाईचे फुगे तीन ते चार जणांनी फेकले. त्यानंतर या ठिकाणी राजकीय वातावरण चिघळू नये म्हणून त्या परिसरात राज्य राखीव पोलीस दलाच्या एका तुकडीसह स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला. यावेळी उपायुक्त अंबुरे यांच्यासह कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे, राबोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे, उपनिरीक्षक महेश जाधव, ठाणेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी आदी अधिकाऱ्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. 

शिवसैनिकांना रोखण्यात पोलीस यशस्वीnनौपाडा पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर शिवसैनिकांचा जथ्था भाजपच्या कार्यालयाकडे येणार होता. मात्र, सिद्धेश्वर तलावाजवळच शिवसैनिकांना पोलिसांनी रोखले. nतसेच भाजपच्या कार्यालयाकडे येणारी वाहतूक रोखून धरली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, भाजप कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी चौघांना राबोडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नंतर त्यांची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :BJPभाजपाthaneठाणे