शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरीकांचा शोध घेण्यात पालिकेची अनास्था, नारायण पवार यांचे आयुक्तांनी पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 15:47 IST

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात नाही, त्यांचा शोध घेतला जात नसल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे जेष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त विजय सिघंल यांना पत्र देऊन याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी केली आहे.

ठाणे : कोरोनाच्या पॉझीटीव्ह रु ग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींबाबत माहिती घेण्याबरोबरच त्यांचा शोध घेऊन क्वारंटाईन करण्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अनास्था दाखिवली जात असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. ठाणे शहरातील दोन ठिकाणी घडलेल्या घटनांची माहिती देत त्यांनी आयुक्त विजय सिंघल यांना पत्र पाठवून तातडीने हालचाली करण्याची मागणी केली आहे.                  ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील एका इमारतीत बुधवारी रु ग्ण आढळला होता. मात्र, त्यानंतरही त्याची राहती इमारत सील केलेली नाही. त्याची मुले खुलेआमपणे रस्त्यावर फिरत होती. संबंधित रु ग्णाच्या पत्नीचे १२ ते १५ दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, अंत्यसंस्कारासाठी आलेले नातेवाईक व मित्र परिवार, उत्तरकार्यासाठी आलेला पुरोहित यांची माहिती महापालिकेने घेतली नाही. या काळातच संबंधित रु ग्णाला चक्कर आल्यानंतर रु ग्णालयात नेण्यात आले होते. त्याला रु ग्णालयात नेणारे नागरिक व रु ग्णालयाची माहितीही प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. दुसºया एका घटनेत, कोरोना पॉझीटीव्ह आढळलेल्या एका व्यक्तीची शहरातच लॉंड्री आहे. त्याठिकाणी त्याची सातत्याने ये-जा सुरू होती. त्याच्या परिचयातील काही पॉझीटीव्ह झालेल्या रु ग्णांचे गणवेशही लॉंड्रीत धुण्यासाठी आणले जात होते. मात्र, या लॉंड्रीतील कर्मचारी व आजूबाजूच्या दुकानदारांची माहिती अद्यापी प्रशासनाने घेतली नाही. अशा परिस्थितीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर रु ग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.ठाणे शहरात सध्या खाजगी लॅबच्या माध्यमातून संशियत रु ग्णांची तपासणी सुरू आहे. मात्र, त्यासाठी ४५०० रु पये मोजावे लागत आहेत. ते सामान्य नागरिकांना परवडणारे नाही. तरी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने कोरोनाच्या संशियत रु ग्णांची तपासणी सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

  • जंतूनाशकांच्या तपासणीची मागणी

गेल्या महिनाभरात ठाणे शहरातील विविध भागांत जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. मात्र, कोरोना आटोक्यात आलेला नाही. उलट १०० हून अधिक रु ग्णसंख्या झाली. त्यामुळे संबंधित जंतूनाशक औषधे परिणामकारक आहेत का, त्याचा उपयोग झाला आहे का, याबाबत चौकशी करावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाBJPभाजपा