शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत तिघांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:34 IST

सिंग, डुंबरे, बुरडे चर्चेत; नियुक्तीकडे ठाणेकरांचे लक्ष

- अजित मांडके ठाणे : मुंबईत पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे वारे वाहत असताना आता ठाण्यातही ते वाहू लागले आहेत. पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेले विवेक फणसळकर यांच्या बदलीची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात सुरू झाली असून त्यांच्या जागी तिघांची नावे आघाडीवर आली आहेत. विशेष म्हणजे या तिघांनी यापूर्वी ठाणे पोलीस दलाचे कामकाज हाताळले आहे.राज्य शासनाकडून गेल्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू झाल्या आहेत. त्यानुसार, मागील काही दिवसांत अनेकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात आता मुंबईपाठोपाठ ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहेत. फणसळकर यांनी ३१ जुलै २०१८ रोजी ठाणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. येत्या जुलै महिन्यात त्यांच्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यापूर्वीच आता त्यांच्या बदलीची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू झाली आहे.महाविकास आघाडीच्या सरकारकडून मर्जीतील मंडळींची वर्णी विविध ठिकाणी लावली जात आहे. याचाच एक भाग म्हणून फणसळकर यांच्याही बदलीच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. त्यांच्या जागी आता सर्वात आघाडीवर असलेले नाव बिपिनकुमार सिंग यांचे आहे, सध्या ते अप्पर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी ठाण्यात सहपोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या खालोखाल आशुतोष डुंबरे यांचेही नाव आघाडीवर आले असून ते अप्पर पोलीस महासंचालक म्हणून अ‍ॅण्टी करप्शन ब्युरोमध्ये काम पाहत आहेत. त्यांनीही यापूर्वी ठाण्यात सहपोलीस आयुक्त म्हणून ठाण्यात काम पाहिले आहे. प्रशांत बुरडे हे सुद्धा सध्या अप्पर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहत असून त्यांचेही नाव आता आघाडीवर आहे. त्यांनीसुद्धा यापूर्वी ठाण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे विभागासाठी काम पाहिले आहे. आता या तिघांपैकी कोणाची निवड होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.गुन्हेगारीवर अंकुशशांत स्वभावाचे असलेले विवेक फणसळकर यांनी आपला कार्यकाळ फारसा गाजवला नसला, तरी अनेक महत्त्वाच्या घटनांचा तपास लावण्याच्या कामात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. वाढत्या गुन्ह्यांवर अंकुश बसवण्यातही त्यांना यश आले आहे.