शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पुर्वेत एक हजार ६६६ मतदारांची नावे वगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:48 IST

कल्याण पूर्व : सकाळच्या सत्रात मतदानासाठी गर्दी, नावे शोधण्यासाठी मोबाइल अ‍ॅप्सचा वापर

कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळपासून मतदानकेंद्रांवरमतदानासाठी मतदारांच्या रांगा पाहावयास मिळाल्या. प्रत्येक बुथवर मतदार आपले नाव मतदारयादीत आहे का, याचा शोध घेत होते. त्यासाठी छापील यादीऐवजी मोबाइल अ‍ॅप्स व ऑनलाइनद्वारे नावे शोधण्यास जास्त प्राधान्य दिले. या मतदारसंघात तीन लाख ४० हजार ३०९ मतदार आहेत. त्यापैकी एक हजार ६६६ मतदारांची नावे वगळली गेली. त्यामुळे त्यांना हक्क बजावता आला नाही.

कोळसेवाडी परिसरातील बुथवर मतदार त्यांची नावे शोधत होते. मात्र, यादीत नावे न सापडल्यास अनेक जण मोबाइल अ‍ॅप तसेच ऑनलाइनद्वारे नावे शोधताना दिसत होते. कोळसेवाडीतील गायत्री विद्यालय आणि नेतिवलीनाका येथील प्रबोधनकार ठाकरे महापालिका शाळेत मतदारांनी गर्दी केली होती. तेथे यादीतून नावे शोेधून मतदान केंद्र गाठण्यासाठी मतदारांची झुंबड उडाली होती. चिंचपाडा येथील मतदानकेंद्र टेकडी परिसरात असल्याने मतदानकेंद्र गाठताना मतदारांची भरउन्हात दमछाक झाली. टेकडीच्या पायथ्याशी दिव्यांग मतदारांना नेण्यासाठी रिक्षाची सोय होती. तसेच तेथे दिव्यांग मतदारांना नेआण करणारी केडीएमसीची बस फिरताना दिसली.पिसवली भागातील मतदारांनी आमच्या नावाच्या स्लिप राजकीय पक्षांकडून मिळाल्या नसल्याच्या तक्रारी केल्या. महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी मतदानाची स्लिप आली होती. मग, आता लोकसभा निवडणुकीच्या वेळी का आल्या नाहीत, असा सवाल केला. प्रत्यक्षात निवडणूक आयोगाकडून या स्लिप वाटल्या जातात. मात्र, त्यांच्याकडूनही त्यांचे वाटप झाले नाही. केवळ मतदान करा, मतदानाचा टक्का वाढवा, असे पोकळ आवाहन निवडणूक आयोगाने केले, असे काही मतदारांनी सांगितले.

नांदिवलीतील सुवर्णा देशमुख म्हणाल्या की, मला मतदानाची स्लिप राजकीय पक्षांकडून मिळाली. मात्र, माझ्या पतीच्या नावाची स्लिप मिळाली नाही. तर, नेतिवलीत राहणारे कैलास म्हात्रे म्हणाले की, माझा मुलगा विशाल याचे नाव डोंबिवलीतील आजदे येथील मतदारकेंद्राच्या यादीत आढळले. त्यामुळे मतदारयादीत घोळ झाल्याचे स्पष्ट होते.

शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी म्हणाले की, लोकग्राम संकुलातील उल्हास इमारतीत ५६ सदनिका असून, अडीच हजार मतदार असल्याची यादी दिली आहे. कृष्णा इमारतीत ३६ सदनिका आहेत. तेथे एक हजार ६०० मतदार राहत असल्याचे यादीत नमूद केले आहे. यावरून मतदारयाद्यांचे काम सदोष झाले, हेच उघड होत आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान