शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

खड्ड्यांना महापौर, उपमहापौरांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 02:03 IST

शिवसेनेने मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना महापौर, उपमहापौर, सभापती, गटनेत्यांची नावे देऊन निषेध केला.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर पालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या भ्रष्ट कारभारामुळे शहरातील एकही रस्ता नागरिकांसाठी सुरक्षित राहिलेला नसून खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करत शिवसेनेने गुरुवारी मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना महापौर, उपमहापौर, सभापती, गटनेत्यांची नावे देऊन निषेध केला.सकाळी भार्इंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट येथील क्र ीडासंकुलाबाहेरच्या मुख्य रस्त्यावर शिवसेनेने खड्ड्यांचे नामकरण केले. खड्ड्यांना महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, प्रभाग समिती सभापती अरविंद शेट्टी, मदन सिंह, रीटा शाह, दिनेश जैन, परशुराम म्हात्रे, डॉ. सुशील अग्रवाल, गटनेते हसमुख गेहलोत यांच्या नावांचे फलक लावले होते.विरोधी पक्षनेते राजू भोईर, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला उपजिल्हासंघटक स्नेहल सावंत, नगरसेवक प्रवीण पाटील, नीलम ढवण, अनिता पाटील, स्नेहा पांडे, धनेश पाटील, कमलेश भोईर, जयंती पाटील, माजी नगरसेवक शरद पाटील, लक्ष्मण जंगम, शहरप्रमुख प्रशांत पालांडे, धनेश पाटील, प्रकाश मांजरेकर, शहर संघटक सुप्रिया घोसाळकर, विजय वाळंज, सुभाष केरकर, शिवशंकर तिवारी, विकास पाटील, नीशा नार्वेकर आदी सहभागी झाले होते.भाजपाच्या भ्रष्ट कारभारामुळे शहर खड्डेमय झाले आहे. फक्त स्वत:चा अर्थपूर्ण विकास साधण्यातच भाजपा नेते मग्न असून त्यांना व पालिकेला रस्त्यांची झालेली चाळण दिसत नाही.भाजपावर ओढले आसूडसत्ताधाऱ्यांना नागरिकांनी आता खड्ड्यांत टाकले नाही, तर संपूर्ण शहरच काय राज्य व देशही भाजपा खड्ड्यांत घालेल, अशी टीका शिवसेनेने केली. याआधी शिवसेनेने मीरा रोडच्या हटकेश भागातील मुख्य रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले. एकूण राजकारण तापले आहे.

टॅग्स :Potholeखड्डेShiv Senaशिवसेनाthaneठाणे