शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जमीनखरेदीच्या नावाखाली डॉक्टरांना १४ लाखांचा गंडा, भामट्याला कोल्हापुरातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 20:24 IST

मुरबाडमधील आदिवासींची जमीन नावावर करून देतो, अशी बतावणी करून ठाण्यातील दोन ज्येष्ठ डॉक्टरांना सुमारे १४ लाखांचा गंडा घालणा-या दीपक बर्गे याला नौपाडा पोलिसांनी बुधवारी रात्री कोल्हापुरातून अटक केली.

ठाणे, दि.10  -  मुरबाडमधील आदिवासींची जमीन नावावर करून देतो, अशी बतावणी करून ठाण्यातील दोन ज्येष्ठ डॉक्टरांना सुमारे १४ लाखांचा गंडा घालणा-या दीपक बर्गे याला नौपाडा पोलिसांनी बुधवारी रात्री कोल्हापुरातून अटक केली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.नौपाड्यातील डॉक्टर लालजी सेठिया (७५) आणि ऐरोलीतील डॉ. चंद्रकांत गंगावणे (७६) यांनी २०११-२०१२ मध्ये मुरबाड येथील आदिवासी जमीन उल्हासनगरच्या बर्गे याच्याकडून खरेदी केली होती. त्यासाठी डॉ. सेठिया यांनी त्याला दोघांचे प्रत्येकी सात लाख असे १४ लाख रुपये त्याच्या नौपाड्यातील घरी नेऊन दिले होते. यातील काही रक्कम रोख, तर काही धनादेशाच्या स्वरूपात दिली होती. २०११ ते २०१६ अशी पाच वर्षे उलटूनही बर्गे हा व्यवहार पूर्ण करत नव्हता. जमीन आदिवासी असली, तरी मंत्र्याकडून, शासनाकडून आणि तलाठ्याचीही परवानगी मिळवून आणतो, अशीही त्याने त्यांना वारंवार बतावणी केली. दरम्यानच्या काळात डॉ. सेठिया हे आजारी पडले. त्यामुळे त्यांनी पाठपुरावा केला नाही. पण, वारंवार आश्वासने देऊनही बर्गे याने तलाठ्याची किंवा कोणत्याही मंत्र्याची संबंधित जमिनीच्या विक्रीची परवानगी आणली नाही. तसेच तो व्यवहार पूर्ण न करता, जमिनीचा ताबाही या दोन्ही डॉक्टरांना दिला नाही. अखेर, कंटाळून डॉ. सेठिया यांनी याप्रकरणी १८ आॅक्टोबर २०१६ ला नौपाडा पोलीस ठाण्यात बर्गे याच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली. नौपाडा पोलीस गेल्या वर्षभरापासून त्याच्या पाळतीवर होते. अखेर, तो कोल्हापूर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव, प्रकाश पाटील आणि संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल बनकर, पोलीस नाईक प्रशांत निकुंभ आणि गोविंद पाटील आदींच्या पथकाने त्याला ९ आॅगस्टला रात्री कोल्हापुरातून ताब्यात घेतले.असा लावला सापळा...खबरी आणि बर्गेच्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे बनकर यांच्या पथकाने कोल्हापुरातील मूळ घर शोधले. ते बंदच होते. त्याच्या भावाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिवसभर तळ ठोकून सापळा लावून अखेर त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर, त्याला ठाण्यात आणून अटक केल्याचे निरीक्षक प्रकाश पाटील यांनी सांगितले.