शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली ठाण्यातील दोन महिलांनी केली ३७ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 21:07 IST

बॅकेत नोकरीला लावण्याच्या नावाखाली दोन महिलांनी चरईतील महिलेकडून ३७ लाख ८५ हजारांची रक्कम घेऊन फसवणूक केली. अशाच प्रकारे यापूर्वीही त्यांनी अनेकांची फसवणूक केली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देबँकेत नोकरीस असल्याची बतावणीअधिका-यांना पैसे देण्याच्या नावाखाली उकळले पैसेअनेकांची फसवणूक करुन दोन्ही महिला पसार

ठाणे: बँकेत मोठया पदावर नोकरीला असल्याचे भासवून दोन महिलांनी ठाण्याच्या चरईतील एका महिलेच्या नातेवाईकांना नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून ३७ लाख ८५ हजार रुपये उकळले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जयश्री मोहिते (६०) आणि मेघा कदम (३४) या दोन महिलांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.ठाणे पश्चिम भागातील चरई येथे वास्तव्यास असलेल्या तृप्ती परब यांना मोहिते आणि कदम या दोन महिलांनी परब यांना बॅकेत असल्याची बतावणी केली. परब यांचे पती, नणंद आणि भाऊ यांना कॅनरा बँकेत नोकरीला लावण्याचे अमिष दाखवत त्यांनी सुरुवातीला त्यांच्याकडून ८५ हजार रुपये घेतले. विश्वास संपादन होण्यासाठी त्यांनी हे पैसे बॅकेत आॅनलाईनद्वारे वळते केले. पुढे हे काम होण्यासाठी मोठया अधिकाºयांनाही पैसे द्यावे लागतील अशी बतावणी करीत त्यांच्याकडून पुन्हा प्रत्येकासाठी ५० हजार ते तीन लाखांची रक्कम घेतली. कालांतराने या दोघींनीही त्यांना आपल्या घरी बोलवून पुन्हा लाखाच्या पटीत रकमा घेतल्या. यातील काही रकमा रोख तर काही धनादेशाद्वारे घेतल्या. २७ जानेवारी २०११ ते ७ आॅक्टोंबर २०१३ या काळात त्यांनी परब यांच्या नातेवाईकांना बँकेत लावण्यासाठी ३७ लाख ८५ हजार रुपये घेतले. इतकी रक्कम घेऊनही तिघांपैकी कोणालाही त्यांनी बॅकेत नोकरी लावली नाही. परब कुटूंंबियांनी या दोन्ही महिलांची चौकशी केल्यानंतर दोघींपैकी कोणीही बॅकेत नोकरीला नसल्याची माहिती पुढे आली. त्यामुळेच या कुटूंबियांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करुन दोन्ही महिलांकडे पैशांचा तगादा लावला. तेंव्हा त्यांनी ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कुठेही तक्रार केल्यास आत्महत्या करु आणि चिठ्ठीमध्ये तुमची नावे टाकू, अशीही धमकी त्यांना दिली. हा प्रकार सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर याप्रकरणी परब कुटूंबियांनी अखेर १६ जानेवारी २०१८ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक किरण बघडाणे अधिक तपास करीत आहेत.या आधीही फसवणूककदम आणि मोहिते या दोन्ही महिलांनी चारच दिवसांपूर्वी रेखा परब यांच्याही मुलीला बँकेत नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून दोन लाख १५ हजारांची रक्कम घेऊन फसवणूक केली. यापूर्वीही २००८ मध्ये अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :thaneठाणेPolice Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हा