शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

मृतांची नावे यादीत; तर हयात मतदार बेपत्ता

By admin | Updated: February 22, 2017 06:10 IST

वागळे इस्टेट, वर्तकनगर या परिसरात अनेक मतदारांची नावेच मतदारयादीतून गायब असल्यामुळे

ठाणे : वागळे इस्टेट, वर्तकनगर या परिसरात अनेक मतदारांची नावेच मतदारयादीतून गायब असल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. अनेक मृतांची नावे मात्र मतदार यादीत होती. अनेकांच्या नावातील बदलामुळे त्यांना नावे शोधण्यात बराच वेळ खर्ची घालावा लागला. मतदान यंत्रातील बिघाडामुळे शिवसेनेच्या नगरसेविका तथा उमेदवार विमल भोईर यांना तर अर्धा तास मतदान केंद्रातच ताटकळावे लागल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या बाजूलाच असलेल्या जिजामाता बचत गट येथील मतदान केंद्रावर भोईर या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मंगळवारी सकाळी ७.३० वा. गेल्या होत्या. मतदान यंत्राचे वारंवार बटण दाबूनही त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा आवाज येत नव्हता. ते बंदच असल्याचे आढळल्यावर त्यांनी ही बाब मतदान केंद्राध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. त्याची पाहणी करून ते बदलण्याच्या प्रक्रियेत अर्धा तास गेला. अखेर ८ वा. भोईर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महापालिका आणि निवडणूक आयोगाच्या या ढिसाळ कारभाराबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रभाग क्रमांक सात येथील २७ क्रमांकाच्या केंद्रावर मतदान यंत्र अ, ब, क आणि ड या क्रमाने लावण्याऐवजी ड, क, ब आणि अ या उलट्या क्रमाने लावली होती. त्याला मनसेचे शाखाध्यक्ष संतोष निकम आणि इतर उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानंतर यंत्र पुन्हा अ ते ड या क्रमाने लावण्यात आली. असाच गोंधळ वर्तकनगरच्या ३१० आणि ३११ या मतदान केंद्रावर होता. याठिकाणीही शिवसेनेच्या उमेदवार विमल भोईर यांनी आक्षेप घेतल्यावर याठिकाणची यंत्रे अ ते क या क्रमाने ठेवण्यात आली. (प्रतिनिधी)वागळे इस्टेट पोलीस वसाहतीमधील अनेक पोलीस कुटुंबीयांची नावेच मतदार यादीमध्ये नसल्यामुळे अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मतदारांना मतदार यादीतील नावे शोधून देण्यासाठी सर्वपक्षीयांनी मतदान केंद्राच्या बाहेर आपापली मदत केंद्रे उभारली होती. पण, या केंद्रावरही महापालिकेच्या संकेतस्थळावरुन नावे शोधण्यात कार्यकर्त्यांची आणि मतदारांची चांगलीच दमछाक होत होती. माजी नगरसेवक बळीभाई नईबागकर यांची पुतणी तृप्ती नईबागकर हिचेही मतदार यादीतील फोटो वगळता नाव, वय चुकीचे होते. नईबागकर ऐवजी पवार असे आडनाव प्रसिद्ध झाल्याने त्यांनाही बराच मनस्ताप सहन करावा लागला.कोरस नक्षत्र येथील १५ इमारतींमध्ये ४२० सदनिका आहेत. सहा महिन्यांपूर्वी येथील रहिवाशांनी मतदार यादीत नाव येण्यासाठी अर्जही भरुन दिले. तरीही येथील ७० ते ८० मतदारांची नावेच न आल्यामुळे त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नसल्याचे मिलन जाधव यांनी सांगितले. जे इतर जिल्ह्यातून बदली होऊन आले अशा मृण्मय जाधव यांच्यासह अनेकांची नावेच मतदार यादीत नव्हती. भास्कर बंगेरा, विठ्ठल पाटील, नीता पाटील यांची २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नावे होती. यावेळी मात्र त्यांची नावे नसल्यामुळे त्यांनाही तेही मतदानापासून वंचित राहिले. यादीतील घोळाचा चित्रपट निर्मात्यालाही फटका...कोरस नक्षत्रमधील रहिवासी लेखक, चित्रपट निर्माते संजीव कोलते यांचेही नाव (प्रभाग क्र. १४ ) नसल्यामुळे त्यांनाही मतदान करता आले नाही. अनेक मतदारांचे पत्ते चुकीचे होते. वडिलांचा पत्ता कोरस नक्षत्रमध्ये तर मुलाचा पत्ता रुणवाल प्लाझामध्ये दाखविल्याचाही फटका अनेकांना बसल्याचे दिप्ती पांचाल यांनी सांगितले. अशा ७० ते ८० टक्के मतदारांना फटका बसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.श्रीनगर, वागळे इस्टेट, वर्तकनगर, भीमनगर, शिवाईनगर, शास्त्रीनगर आणि वसंतविहार भागातील वयोवृद्धापासून नवमतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळच्या वेळी असलेली मतदारांची गर्दी दुपारी काहीशी कमी झाली होती. तर ३.३० वा. नंतर पुन्हा अनेक मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. इंदिरानगर, रामनगर, शास्त्रीनगर आणि भीमनगर या झोपडपट्टी परिसरासह म्हाडा वसाहत, वसंतविहारसारख्या उच्चभ्रू वसाहतीमधील मतदारांनीही मतदानासाठी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र पहायला मिळाले.