शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेचेच नाव मतदारयादीतून वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 01:06 IST

अंबरनाथमधील प्रकार : तहसीलदारांकडे केली तक्रार, दोषींवर कारवाईची मागणी

अंबरनाथ : लोकसभा निवडणुकीत मतदारयादीतील घोळामुळे अनेकांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले होते. मतदारयादी निश्चित करण्याआधी जी प्रारूप यादी तयार करण्यात येते, त्यात नाव असतानाही ऐन निवडणुकीच्यावेळी मतदारयादीतून स्थानिक नगरसेविकेचेच नाव वगळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या नगरसेविकेने तहसीलदारांकडे याप्रकरणी तक्रार केली आहे.

चिखलोली भागातील नगरसेविका सारिका शिंगवे यांचे नाव त्यांच्या ३०३ क्रमांकाच्या मतदारयादीत समाविष्ट होते. मतदारयादीतील नाव हे जानेवारी २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीतही होते. त्यामुळे त्या निश्चिंत होत्या. मात्र, निवडणुकीच्या दिवशी मतदानासाठी जाण्याआधी त्यांनी यादीतील नाव शोधण्याचा प्रयत्न केला असता शिंगवे आणि त्यांचे पती रामदास या दोघांची नावे वगळण्यात आली होती. ते ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी नाव नसल्याने त्यांनी अ‍ॅपवरून त्यांचे नाव शोधले असता थेट उल्हासनगर कुर्ला कॅम्प परिसरात असल्याचे लक्षात आले. चिखलोली गावातील नाव थेट उल्हासनगरच्या यादीत गेल्याने त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.

लोकसभा निवडणूक असल्याने त्यांनी उल्हासनगरमध्ये जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, भविष्यात ही चूक पुन्हा झाल्यास त्यांना नगरसेवकपदाच्या निवडणुकीला मुकण्याची वेळ आली असती. यासंदर्भात शिंगवे यांनी तहसीलदार कार्यालयात चौकशी केली असता बीएलओने त्यांचे नाव न वगळण्याचा अहवाल दिला होता. मात्र, असे असतानाही त्यांचे नाव स्थलांतरित करण्यात आले.याप्रकरणी शिंगवे यांनी चौकशी करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नगरसेविकेच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल, अशी प्रतिक्रिया शिंगवे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशीही अनेकांची नावे वगळल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान