शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केवळ शंभर रुपयांत साकारली आरास, सजावटीची रक्कम देणार पुरग्रस्तांना नाईक कुटुंबियांचा निर्धार

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 5, 2019 15:23 IST

ठाण्यातील नाईक कुटुंबियांनी केवळ १०० रुपयांत घरगुती गणेशोत्सवासाठी आरास करुन सजावटीची रक्कम पुरग्रस्तांना देण्याचा निर्धार केला आहे.

ठळक मुद्देकेवळ शंभर रुपयांत साकारली आराससजावटीची रक्कम देणार पुरग्रस्तांना इकोफ्रेण्डली सजावटीबरोबर इकोफ्रेण्डली गणेश मुतीर्ची स्थापना

प्रज्ञा म्हात्रेठाणे : केवळ १०० रुपयांत घरगुती गणेशोत्सवासाठी आरास करुन सजावटीचा खर्च पुरग्रस्तांना देण्याचा निश्चय ठाण्यातील नाईक कुटुंबियांनी केला आहे. इकोफ्रेण्डली सजावटीबरोबर इकोफ्रेण्डली गणेश मुतीर्ची स्थापना या कुटुंबियांनी केली आहे.              सोमवारपासून गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक संदेश देण्यावर भर दिला आहे. गेल्या काही वर्षांत घरगुती गणेशोत्सवातही सामाजिक संदेश देण्याचा पायंडा घातला आहे. अलिकडे घरगुती गणेशोत्सवातही इकोफ्रेण्डली सजावट करण्याकडे भक्तांचा कल असतो. ठाण्यातील लोकमान्यनगर येथील नाकोडा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नाईक कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवात एक वेगळाच संकल्प केला आहे. दरवर्षी सजावटीसाठी तीन ते चार हजार रुपये खर्च करणाºया नाईक कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवात हा खर्च वाचवून तो सांगली - कोल्हापूर ़येतील पुरग्रस्तांना देण्याचा निश्चय केला आहे. यावेळेस त्यांनी फक्त १०० रुपये खर्च करुन ही अभिनव आरास केली आहे. त्यांनी पानांपासून तयार केलेल्या पत्रावळ््यांचा आणि पुठ्ठ्यांची आरास या गणेशोत्सवात केली आहे. सात वर्षांच्या देवश्री नाईक हिने आपल्या शाळेत अशाच प्रकारची आरास पाहिली होती आणि आपल्या घरात बाप्पासाठी पत्रावळीची आरास करुया अशी सूचना तिने आपल्या कुटुंबाकडे मांडल्यावर त्या सर्वांनी ही उचलून धरली. देवश्री हिच्यासह सुराग नाईक, सौरभ नाईक, समृद्धी नाईक यांनी दोन दिवसांत पत्रावळ््यांची ही आरास साकारली. सजावटीची रक्कम आम्ही संस्थेच्या माध्यमातून पुरग्रस्तांना देणार आहोत असे सुराग नाईक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यंदाच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे त्यांच्या परिसरातील रहिवाशांकडून कौतुक होत आहे. दरवर्षी अशाच प्रकारचा सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प नाईक कुटुंबियांनी केला आहे. 

टॅग्स :thaneठाणेGaneshotsavगणेशोत्सवfloodपूर