शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचे गूढ कायमच, बार गायिकेची ठाण्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 07:13 IST

नौपाड्यातील एका बारमध्ये गाणाºया पश्चिम बंगालच्या तरुणीने रविवारी रात्री केलेल्या आत्महत्येचे गूढ अद्याप कायम आहे. घोडबंदर रोडवरील एका सोसायटीच्या इमारतीवरून आत्महत्या केली.

ठाणे : नौपाड्यातील एका बारमध्ये गाणाºया पश्चिम बंगालच्या तरुणीने रविवारी रात्री केलेल्या आत्महत्येचे गूढ अद्याप कायम आहे. घोडबंदर रोडवरील एका सोसायटीच्या इमारतीवरून आत्महत्या केली. तिने यापूर्वीही काही वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती तपासामध्ये उघड झाली आहे.पश्चिम बंगालची सुनीता दास (२८) नौपाड्यातील एका बारमध्ये गाणे गाण्याचे काम करायची. घोडबंदर रोडवरील कॉसमॉस ज्वेलर्समध्ये बाराव्या मजल्यावर ती भाड्याने राहायची. रविवारी रात्री उशिरा तिने इमारतीवरून उडी मारली. पोलिसांनी तिच्या फ्लॅटची पाहणी केली असता, तिथे मद्याचे ग्लास आणि अर्धवट जळालेल्या सिगारेट होत्या. तरुणी अविवाहित असून ती नशेच्या अधीन असावी, असा संशय आहे. तिच्या हातावर ब्लेडने कापल्याच्या जखमा दिसल्या. त्यावरून तिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असे दिसत असल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढोले यांनी सांगितले. तिच्या पश्चिम बंगालस्थित नातेवाइकांना घटनेची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार, त्यांनी ठाण्यात येऊन मृतदेहाचा ताबा घेतला. नातलगांना सुनीता दासबाबत तपशीलवार विचारपूस करण्यात आली. तिचा स्वभाव, तिला काही अडचणी होत्या का, कुणाचा त्रास होता का, अशा विविध प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून घेण्यात आली. मात्र, असा कोणताही प्रकार नसल्याची माहिती नातलगांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सुनीताचे वास्तव्य असलेल्या कॉसमॉस ज्वेलर्स सोसायटीतील रहिवाशांकडूनही पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याकडूनही विशेष माहिती मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.कारण अद्याप अस्पष्ट; संबंधितांचे जबाब घेणारआत्महत्येचे कारण स्पष्ट होत नसल्याने ती नौपाड्यातील ज्या बारमध्ये कामाला होती, तेथील संबंधित लोकांचे जबाब नोंदवले जातील, अशी माहितीही पोलिसांनी दिली. सुनीता दासचा मोबाइल फोन पोलिसांनी हस्तगत केला आहे. तिचे कॉल डिटेल्स पोलिसांनी मागवले असून ते प्राप्त झाल्यानंतर तिने शेवटचा कॉल किंवा मेसेज कुणाला केला होता, ती वारंवार कुणाच्या संपर्कात होती, इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्या