शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

माझी इ शाळा, डिजिटल साक्षर मिशन अभियानाचे शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 20:09 IST

नितीन पंडित  भिवंडी - कोरोना संकट काळानंतर ऑनलाईन शिक्षण पद्धती सर्वत्र वापरली जात असल्याने राज्याच्या डिजिटल शाळा सुरु झाली ...

नितीन पंडित 

भिवंडी - कोरोना संकट काळानंतर ऑनलाईन शिक्षण पद्धती सर्वत्र वापरली जात असल्याने राज्याच्या डिजिटल शाळा सुरु झाली पाहिजे असे निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्यातील माझी इ शाळा या डिजिटल साक्षर मिशन अभियानाची सुरुवात भिवंडीतून करण्यात आली.शनिवारी भिवंडीतील काल्हेर जिल्हा परिषद शाळेत या अभियानाचे उदघाटन राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रथम इन्फोटेक फाउंडेशन,जिल्हा परिषद ठाणे व राज्य शासनाच्या समग्र शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह एल अँड टी,प्रथम फाउंडेशनचे अधिकारी तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात मातृभाषेतून शिक्षण ही नवीन शिक्षण पद्धती अमलात आणल्याने आता विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेणे सोयीचे होणार असल्याने  इंजीनियरिंग व मेडिकल मधील विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फायदा होणार असून इंग्रजी भाषेचा आपल्यावर असलेला पगडा देखील हळूहळू कमी होणार असल्याचे मत केसरकर यांनी यावेळी व्यक्त करत पंतप्रधान मोदींचे भरभरून कौतुक केले.विदेशातील नागरिकांना मातृभाषेवर प्रेम असल्याने अनेक देशांमध्ये स्थानिक मातृभाषेतून शिक्षण घेत असल्याने ही राष्ट्र शिक्षणात व आर्थिक सुबत्त्यात अग्रेसर असल्याचे मत देखील केसरकर यांनी व्यक्त केले.

स्किल डेव्हलपमेंट महत्त्वाचे असून शाळांना सॅटॅलाइटवर जोडण्यात येणार असल्याने आदिवासी व दुर्गम भागातील ऑनलाइन शिक्षण पद्धतीतील अडचणी दूर होणार असून शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेली अक्षरे विद्यार्थ्यांच्या मोबाईल ॲप वर संग्रहित होणार असल्याची टेक्नॉलॉजी देखील लवकरच राज्यात विकसित करण्यात येणार असल्याचेही यावेळी केसरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर