शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सोने गहाण ठेवून मुथुट फायनान्सची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 04:30 IST

बनावट सोने गहाण ठेवून मुथुट फायनान्सची फसवणूक केल्याप्रकरणी कळव्यातील एका आरोपीविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणामध्ये मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

ठाणे : बनावट सोने गहाण ठेवून मुथुट फायनान्सची फसवणूक केल्याप्रकरणी कळव्यातील एका आरोपीविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणामध्ये मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.मुथुट फायनान्स कंपनीची ठाण्यातील गोखले रोडवर शाखा आहे. रोहित सुर्वे हे ठाण्याचे शाखा व्यवस्थापक असून त्यांच्या नियंत्रणातील दोन कर्मचाऱ्यांकडे ग्राहकांचे सोने तपासण्याची जबाबदारी आहे. २२ मे रोजी कळव्यातील मनीषनगरात राहणारा सुशांत साळवी हा या शाखेमध्ये गेला. माझी आई आजारी असून सोने गहाण ठेवून मला तातडीने कर्ज द्या, अशी विनंती त्याने केली. त्याने ७१ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन चेन शाखेतील कर्मचाºयांना दिल्या. कर्मचाºयांनी त्यांच्याकडून वैयक्तिक कर्जासाठीचा अर्ज आणि घोषणापत्र भरून घेतले. सुशांतची आणि त्याने दिलेल्या सोन्याची तपशीलवार माहिती तसेच पॅनकार्ड आणि आधारकार्डची छायांकित प्रत कर्मचाºयांनी घेतली. त्यानंतर,दोघांनी साळवीने दिलेल्या दोन्ही चेन काळ्या दगडावर घासल्या. तसेच नायट्रिक अ‍ॅसिड आणि मिठाचे पाणी टाकूनही सोन्याची तपासणी केली. त्या खºया असल्याची खात्री पटल्यानंतर एक लाख ५० हजार रुपये त्याच्या खात्यावर जमा करण्यात आले.५ जून रोजी मुथुट फायनान्स कंपनीचे लेखापरीक्षक ठाणे शाखेत आले. त्यांनी शाखेतील सर्व सोन्याची गुणवत्ता तपासली. त्यावेळी सुशांत साळवीने दिलेल्या चेन सोन्याच्या नसून चांदीच्या असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चेनला सोन्याचा केवळ मुलामा देण्यात आला होता. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर ५ जुलै रोजी मुथुटचे ठाणे शाखा व्यवस्थापक रोहित सुर्वे यांनी नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, नौपाडा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.कर्मचाºयांच्या भूमिकेवर संशयआरोपी सुशांतने मुथुट फायनान्सकडे सोन्याच्या चेन तारण ठेवल्या, त्यावेळी दोन्ही चेन खºया असल्याची खात्री कर्मचाºयांनी पटवली होती. त्यानंतर, त्या बनावट असल्याचे कंपनीच्या लेखापरीक्षकाच्या लक्षात आले. जी बाब लेखापरीक्षकाच्या लक्षात येऊ शकते, ती कर्मचाºयांच्या लक्षात का आली नाही, या मुद्यावरही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आवश्यकतेनुसार मुथुटच्या कर्मचाºयांचीही चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा