शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खर्चाचे २०० रुपये दिले नाही म्हणून हत्या करणाऱ्यास जन्मठेप 

By धीरज परब | Updated: July 11, 2024 13:23 IST

ठेकेदाराने कामासाठी ठेवलेले कर्मचारी येथेच लेबर कॅम्पमध्ये रहायचे .  

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - खर्चासाठी २०० रुपये दिले नाही म्हणून माळी काम करणाऱ्या कामगाराने सुपरवायझरची डोक्यात हातोडा मारून हत्या केली होती . बुधवार १० जुलै रोजी ठाणे न्यायालयाने हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेप सह १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे . 

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत दहिसर चेकनाका जवळ सिंगापुर इंटरनेशनल शाळा आहे . सदर शाळेतील उद्यानचे माळी काम करण्यासाठी गुजरातचा ठेकेदार नेमला होता . ठेकेदाराने कामासाठी ठेवलेले कर्मचारी येथेच लेबर कॅम्प मध्ये रहायचे .  

२०२० साली लक्ष्मण दिता काकण ( ५८ )  सागवाडा , उदयपूर  हा माळीकाम करणारा मजूरास महिना ५ हजार पगार व दर आठवड्यास २०० रुपये दिले जायचे . लक्ष्मण आजारी असल्याने कामावर आला नव्हता म्हणून सुपरवायझर देवा उर्फ देवीलाल हरिराम कलागुमन  ( २५ )  मूळ रा . सलवाडा , उदयपूर , राजस्थान ह्याने खर्चाचे २०० रुपये इतर मजुरांना दिले मात्र लक्ष्मण ह्याला पैसे दिले नाहीत. त्याचा राग येऊन लक्ष्मणचे देवा सोबत भांडण झाले.  त्या रागातून देवा झोपला असताना त्याच्या डोक्यात हातोडा मारून  लक्ष्मण याने त्याची हत्या केली . देवा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता व त्याच्या शेजारी  लक्ष्मण बसला असल्याचे आढळून आले. 

तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ६ मे २०२० रोजी हत्येचा गुन्हा दाखल करत लक्ष्मण ह्याला अटक केली होती . तत्कालीन पोलीस निरीक्षक गणेश भामरे यांनी तपास अधिकारी म्हणून  तपास केला होता . सदर हत्येचा खटला ठाणे न्यायालयात सुरु होता . 

सध्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट कारकून हवालदार नितीन कासार , शिपाई साईदास चव्हाण, अनिल मढवी, हवालदार सचिन बर्डे आदी न्यायालयाशी संबंधित काम करत होते . सरकारी अभियोक्ता ए . पी . लाडवंजारी व  कोरडे यांनी न्यायालयात बाजू मांडली . 

ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीश  आगरवाल यांनी तपास अधिकारी सह साक्ष व पुराव्यांच्या आधारे आरोपी लक्ष्मण ह्याला हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवत  जन्मठेप  व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिना साधा कारावास  अशी शिक्षा सुनावली आहे . 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी