शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीचा हिशेब मागितल्याने रहिवाशाची हत्या, सचिवाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 06:43 IST

रहिवाशास मारहाण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी, गृहनिर्माण संस्थेच्या सचिवासह त्याच्या दोन मुलांना नयानगर पोलिसांनी अटक केली आहे.

मीरा रोड : ‘आधी गृहनिर्माण संस्थेच्या जमाखर्चाचा हिशेब द्या, मग रंगकामासाठी पैसे मागा,’ असे सांगितल्याचा राग मनात ठेवून, रहिवाशास मारहाण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी, गृहनिर्माण संस्थेच्या सचिवासह त्याच्या दोन मुलांना नयानगर पोलिसांनी अटक केली आहे.नयानगरमधील गंगा कॉम्प्लेक्समध्ये चंद्रश रिवेरा नावाची गृहनिर्माण संस्था आहे. यामध्ये ४८ सदनिका आहेत. या इमारतीची दुरुस्ती आणि रंगरंगोटीसाठी सर्व सदनिकाधारकांकडून पैसे काढायचे ठरले होते, परंतु सहाव्या मजल्यावरील सदनिकेत सुमारे १८ वर्षांपासून एकत्र राहणारे सुरय्या वजीर शेख (५०) व जब्बार गफ्फार भाटी (४५) यांनी मात्र, त्यांच्या वाट्याला येणारे १४ हजार रुपये भरण्यास असमर्थता व्यक्त केली. संस्थेकडे सदस्य नियमित देखभाल-दुरुस्तीचे पैसे भरतात. सदनिका हस्तांतर, भाड्यासाठी आलेले पैसेही जमा आहेत. आधी सर्व पैशांचा हिशेब द्या, असा पवित्रा जब्बार व सुरय्या यांनी घेतला होता. त्यातच, आम्ही मेहनत करून कर्ज फेडून घर चालवितो, पण यांच्या घरात कोणताही कामधंदा न करता दोन-दोन एसी, घरकामासाठी बाई ठेवता, यासाठी पैसा येतो कुठून, असा सवाल सुरय्या यांनी संस्थेचे सचिव अब्दुल मुखीम खान (५०) यांच्याकडे बोट दाखवित केला होता.मंगळवारी रात्री उशिरा जब्बार हे एका रहिवाशासोबत याच विषयावर बोलत होते. सोसायटीच्या सचिवाने पैसे खाल्ले, काम बरोबर करत नाहीत, असे जब्बार बोलत होते. त्याचा राग येऊन अब्दुलने जब्बारला मारहाण केली.सचिव, मुलांची कायम दहशतही सदनिका जब्बार यांच्या नावेच होती. दोन वर्षांपूर्वीती माझ्या नावे त्यांनीकेली होती. सचिव अब्दुलव मुले नेहमी मनमानी व दादागिरी करत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणी बोलत नसे, असे सुरय्या म्हणाल्या.आरोपीनेकेला कांगावाजब्बार खाली पडल्याचे पाहून इमरान यानेच ठाणे ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करून मारामारी झाल्याचे कळविले तसेच नयानगर पोलीस ठाण्यात धाव घेत, इमरानने आपणास दुखापत झाल्याचा कांगावा केला; परंतु सुरय्यानेघडला प्रकार पोलिसांना सांगितल्यावर, अब्दुल, इमरान व मोहसीम यांना पोलिसांनी अटक केली.वाद होत असल्याचेपाहून अब्दुलची मुले इमरान (२७) व मोहसीम (३४) देखील खाली आले. त्यांनीही जब्बार यांना मारहाण केली. त्यात स्टीलच्या खुर्चीवर जोरात आदळून जब्बारयांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Arrestअटकmira roadमीरा रोड