शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत अल्पवयीन युवकाची हत्या, काल्हेर खाडीकिनारी मृतदेह गाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

By नितीन पंडित | Updated: December 7, 2023 18:35 IST

माझ्या मुलाची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी याचना आई कुसुम शर्मा हिने केली आहे.

भिवंडी : शहरात पूर्ववैमनस्यातून एका अल्पवयीन युवकाची हत्या करून मृतदेह काल्हेर येथील खाडीकिनारी निर्जनस्थळी गाडून पुरावा नष्ट केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बुधवारी दोघा युवकांना नारपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.योगेश रवि शर्मा वय १६ वर्ष, ५ महीने असे हत्या झालेल्या अल्पवयीन युवकाचे नाव आहे. काल्हेर येथील आशापुरा कॉम्प्लेक्स या भागात राहणारा योगेश यास २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी काही मित्रांनी काल्हेर येथील रेतीबंदर येथे दारू पिण्यासाठी येत असल्याचे सांगत तेथे चाखण्यासाठी काही घेऊन येण्याचे सांगितले.त्यानंतर योगेश घरातून गेला तो परत आलाच नाही. 

या प्रकरणी कुटुंबीयांनी मुलाचा शोध घेऊन ही न सापडल्याने नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी योगेश अल्पवयीन असल्याने अज्ञातां विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य पाहून नारपोली पोलिसांनी योगेश पूर्वी राहत असलेल्या कामतघर ब्रह्मानंद नगर येथील काही युवकांसोबत यापूर्वी वाद झाला होता.त्या पूर्ववैमनस्यातून अपहरण झाले असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला असता पोलिसांनी ब्रह्मानंद नगर कामतघर परिसरातून आयुश विरेंद्र झा वय १९ वर्ष व मनोज नारायण टोपे वय  १९ वर्ष या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी धारदार हत्याराने योगेशची हत्या केल्याची कबुली देऊन काल्हेर रेतीबंदर येथील निर्जन गवताच्या ठिकाणी मृतदेह पुरून ठेवल्याचे सांगितले.

नारपोली पोलिसांनी घटनास्थळी अप्पर तहसीलदार गायकवाड,नायब तहसीलदार आदेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे. काही दिवसांपूर्वी ब्रह्मानंदनगर येथे माझ्या मुलासोबत भांडण झाले होते. त्या रागातून माझ्या मुलाची हत्या झाली आहे असा झाल आरोप मृतक योगेशची आई कुसुम यांनी केला असून माझ्या मुलाची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी याचना आई कुसुम शर्मा हिने केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी