शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमात अडथळा ठरणाऱ्या बापाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 12:45 IST

भिवंडी तालुक्यात वाडा रस्त्यावरील कवाड गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपाशेजारील मोकळ्या जागेत ९ मार्च रोजी एक मृतदेह आढळून आला.

भिवंडी : एकतर्फी प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या प्रियसीच्या वडिलांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना भिवंडी तालुका पोलीस ठाणे क्षेत्रातील कवाड येथे घडली. यामधील हत्या करणाऱ्या आरोपीस भिवंडी तालुका पोलिसांनी बिहार येथून अटक केली. कमलजीत वारीयम सांडे (वय ५५ रा. उल्हासनगर नंबर ५) असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर पप्पू कुमार राजकिशोर साह (वय २६ रा. उल्हासनगर मूळ रा. चंपारण्य बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

भिवंडी तालुक्यात वाडा रस्त्यावरील कवाड गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपाशेजारील मोकळ्या जागेत ९ मार्च रोजी एक मृतदेह आढळून आला. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा पंचनामा करून ओळख पाठविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा मृतदेह उल्हासनगर येथील कमलजीत वारीयम सांडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांकडून व बातमीदारांकडून माहिती घेऊन तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, तो बिहार येथे पळून गेल्याचे समजले. त्यामुळे पोलीस पथकाने थेट बिहार गाठून पप्पू कुमार राजकिशोर साह यास ताब्यात घेऊन अटक केली. आराेपीने गुन्ह्याची कबुली दिली असून हत्येसाठी वापरलेले धारदार शस्त्र जप्त केले. त्यास सोमवारी भिवंडी न्यायालयात हजर केले. त्याला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपास अधिकारी दाभाडे यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेDeathमृत्यू