शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून; विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: November 5, 2023 17:20 IST

कॅम्प नं-४, एसएसटी कॉलेज समोरची झाडाझुडपात रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील कानडे याचा शनिवारी रात्री खून झाल्याचा प्रकार उघड झाला.

सदानंद नाईक

 उल्हासनगर : कॅम्प नं-४, एसएसटी कॉलेज समोरची झाडाझुडपात रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील कानडे याचा शनिवारी रात्री खून झाल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून रात्री पर्यंत गुन्हेगारांना अटक करण्याचे संकेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिले आहे. 

उल्हासनागरात गुन्हेगारीचा आलेख उंच जात असतांना कॅम्प नं-४, एसएसटी कॉलेज समोरील झाडाझुडपाच्या जागेत एक मृतदेह पडल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता, माणेरेगावात राहणारा व पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील कानडे याचा मृतदेह असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला. जबर मारहाण झाल्यानंतर कानडे याचा मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणी पोलिसानी अज्ञात इसमावर खुनाचा गुन्हा दाखल केला. तसेच खुनाचा छेडा लावण्यासाठी पोलीस पथके रवाना केली. रविवारी रात्री पर्यन्त गुन्हेगारांना अटक करण्याचे संकेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिले आहे. 

पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील कानडे याचा खून झाल्याने, परिसरात भीतीचे वातावरण आहे. मृत कानडे याचा बदला घेण्यासाठी खून खराबा होऊ नये म्हणून पोलीस सतर्क असून कानडे याचा वैर भावनेतून खून झाला असावा. असे बोलले जात आहे. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत.