शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाड पंचायत समितीच्या इमारतीला लागली गळती; नवीन फर्निचर पाण्यात भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 02:29 IST

चार वर्षांपूर्वीचे बांधकाम

मुरबाड : चार वर्षांपूर्वी कोट्यवधी खर्च करून बांधलेल्या मुरबाड पंचायत समितीच्या इमारतीला गळती लागल्याने नवीन फर्निचर भिजून सडण्याच्या मार्गावर आहे. हे फर्निचर चांगल्या ठिकाणी हलवण्याची तसदीही घेतली जात नसल्यामुळे पंचायत समितीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

मुरबाड पंचायत समितीच्या जुन्या दुमजली इमारतीत सर्व खात्यांना जागा अपुरी पडत असल्याने तीन ते चार कोटी खर्च करून ग्रामीण रु ग्णालयाची जुनी इमारत पाडून तेथे आरसीसी पद्धतीची चार वर्षांपूर्वी पंचायत समिती इमारत बांधण्यात आली. मात्र, नवीन बांधकामाचा आराखडा नियोजनबद्ध न केल्याने ज्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बांधकाम केले, तो विभाग व पाटबंधारे विभाग यांना नवीन इमारतीत जागाच उरली नसल्याने या विभागांची कार्यालये जुन्याच नादुरु स्त इमारतीत ठेवण्याची वेळ पंचायत समितीवर आली आहे. तसेच नवीन इमारतीचे बांधकाम सुमार दर्जाचे झाले आहे. बांधकाम सुरू असतानाच गॅलरीचा भाग कोसळला होता. इमारतीला अनेक तडे गेले आहेत. आता संपूर्ण इमारतीला गळती लागल्याने शांतारामभाऊ घोलप सभागृहातील लाखोंचे नवीन फर्निचर पाण्यात भिजले आहे. पहिल्या माळ्यावर तळे साचल्याने व वरील स्लॅबला जागोजागी भेगा पडल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहेत. या इमारतीच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. इमारतीला गळती लागल्याचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी मान्य करून दुरुस्तीसाठी १० लाखांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला असल्याचे सांगितले.इमारतीचे बांधकाम मी येण्याआधी झालेले असून स्लॅबगळती थांबवण्यासाठी वर पत्र्यांचे शेड बांधले जाईल. यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवला आहे. मंजुरी मिळून निधी उपलब्ध झाला की, कामाला सुरुवात करण्यात येईल. - संदीप चव्हाण, उपविभागीय अभियंता, बांधकाम (जि.प.) उपविभाग, मुरबाड