शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

मुरबाड ग्रा. रुग्णालय अत्यवस्थ

By admin | Updated: August 15, 2015 22:37 IST

मुरबाड ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून सुमारे तीन वर्षे झालीत. नागरिकांना त्वरित उपचार मिळावे म्हणून त्या ठिकाणी ट्रामा केअर सेंटरदेखील सुरू करण्यात आले.

- प्रकाश जाधव,  मुरबाडमुरबाड ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून सुमारे तीन वर्षे झालीत. नागरिकांना त्वरित उपचार मिळावे म्हणून त्या ठिकाणी ट्रामा केअर सेंटरदेखील सुरू करण्यात आले. परंतु, डॉक्टर आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हे रुग्णालय समस्यांच्या विळख्यात सापडले असून तेथील किरकोळ आजार झालेल्या रुग्णांना रुग्णवाहिकेतून उल्हासनगर किंवा कळवा येथे उपचारासाठी पाठविले जाते. या मूलभूत समस्या सोडविण्यास एकही राजकीय पक्ष किंवा सामाजिक संघटना पुढे येत नसल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या रुग्णालयावर तालुक्यातील सुमारे २०५ गाव व पाड्यांची जबाबदारी असल्यामुळे तेथील ओपीडीत दरदिवसाला सुमारे ४०० च्या आसपास रुग्ण येतात. शिवाय, राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच होणारे अपघात, प्रसूती तसेच तालुक्यातील सुमारे सात प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून संदर्भसेवेत आलेले रुग्ण, पोलीस स्टेशनकडून येणाऱ्या एमएलसी केसेसचे आरोपींवर उपचार अशा विविध प्रकारच्या कामांचा व्याप पाहता शासनाने मुरबाड रु ग्णालयाला तीन वर्षांपूर्वी उपजिल्हा रु ग्णालयाचा दर्जा दिला. शिवाय, नागरिकांना तत्काळ उपचारांची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून त्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरदेखील मंजूर केले. परंतु, तेथील तज्ज्ञ डॉक्टर, एक्स रे मशीन आॅपरेटर, वैद्यकीय अधीक्षक, औषध निर्माण अधिकारी, कक्षसेवक, सफाईवाला या पदांसह आयपीएचएसअंतर्गत असलेली मंजूर रिक्त पदे, भूलतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, अधिपरिचारिका, सफाई कामगार, रखवालदार, ओपीडी क्लार्क, लॅब टेक्निशियन तसेच ट्रॉमा केअर सेंटरसाठी ३ विशेष तज्ज्ञ अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. येथे केवळ शिकाऊ डॉक्टरच रुग्णांवर उपचार करीत आहेत. तसेच रुग्णांना पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नसून पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन नादुरुस्त असल्याने वेळोवेळी पाणीपुरवठा खंडित होत आहे.काय आहे स्थिती?-डॉक्टर आणि तंत्रज्ञ यांची अनेक पदे, अनेक महिने आहेत रिक्त -त्यामुळे महागडी मशिनरी राहते आहे वापराविना पडून-रुग्णांचे होतात हाल-त्यांना आधार घ्यावा लागतो खासगी हॉस्पिटल किंवा पूरक सुविधांचा-आमदार कुठल्याही पक्षाचा असो किंवा आमदार मंत्री होवो, रुग्णालय अत्यवस्थच राहते.-ज्यांची ऐपत आहे, ते महागडे उपचार घेतात. आदिवासी आणि गरीबांवर मरणाला सामोरे जाणे एवढाच पर्याय असतो.