शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पालिका, पक्षात मेहतांसोबत अजिबात काम करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:50 IST

काँग्रेसची राज्यमंत्रीपदाची ऑफर नाकारून भाजपला पाठिंंबा देणाऱ्या अपक्ष आमदार गीता जैन यांना आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शहराची सूत्रे त्यांच्या हाती देण्याच्या दिलेल्या आश्वासनांवरुन घूमजाव केले आहे.

मीरा रोड : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि काँग्रेसची राज्यमंत्रीपदाची ऑफर नाकारून भाजपला पाठिंंबा देणाऱ्या अपक्ष आमदार गीता जैन यांना आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शहराची सूत्रे त्यांच्या हाती देण्याच्या दिलेल्या आश्वासनांवरुन घूमजाव केले आहे. त्यातही स्थानिक भाजप आणि नगरसेवकांवर माजी आमदार नरेंद्र मेहतांना आपला वरचष्मा कायम ठेवायचा असल्याने जैन यांना डालवण्याचे प्रकार सुरुच असल्याच्या तक्रारी जैन व समर्थकांनी चालवल्या आहेत. तर नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात मला साथ देत मेहतांना झिडकारले असल्याने महापालिका व पक्षात त्यांच्यासोबत काम करणार नाही, असे जैन यांनी स्पष्ट केले आहे.विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी जैन यांनी चालवली होती. त्यांच्यात आणि मेहतांमध्ये त्यावरुन टोकाचा वाद सुरु झाला होता. जैन यांना भाजप आणि प्रभागातील कार्यक्रमांना न बोलावण्यापासून विविध मार्गाने त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपने तिकीट नाकारल्याने जैन यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. निवडणुकीत त्यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला.निकालानंतर राज्यातील भाजपला सत्ता स्थापनेची गणिते अवघड दिसू लागल्याने अगदी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जैन यांच्याशी संपर्क साधला. जैन यांनी आपण भाजप सोबतच असल्याचा शब्द दिला. पण त्याचवेळी मीरा- भाईंदरच्या नेतृत्वामुळे होत असलेली भाजपची बदनामी रोखून स्वच्छ, पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार नागरिकांना द्यायचा असेल तर महापालिका व पक्ष संघटनेची सूत्रे आपल्या हाती देण्याची अटही जैन यांनी नेत्यांना घातली होती. त्यावेळी नेत्यांनी जैन यांना शब्द दिला होता.जैन भाजपसोबत असूनही त्यांना कोणत्या कार्यक्रमाला बोलावायचे नाही, कुणीही त्यांना भेटायचे नाही असे फतवे निघत होते. शुभेच्छा देण्यासाठी भेटणारे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनाही जाब विचारला जायचा. जैन यांनी तक्रार केल्यावर फडणवीस यांनी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना भाईंदरमध्ये पााठवले. चव्हाण यांनीही भाजपच्या सर्व नगरसेवक आदींची बैठक घेऊन जैन यांना सोबत घेण्याचा वरिष्ठांचा आदेश कळवला. परंतु त्या नंतरही जैन यांना लांबच ठेवले जात आहे.फडणवीस यांच्याकडे जैन व मेहता यांची एकत्र बैठक झाली. त्या बैठकीत दोघांनी मिळून काम करा अशी सूचना दिली. परंतु नेत्यांनी आधी दिलेला शब्द आणि मेहतांच्या विरोधात दिलेला कौल या मुळे एकत्र काम करणे शक्य नसल्याचे जैन यांनी स्पष्ट केले. पाठीत खंजीर खूपसून घेण्याऐवजी तलवार घेऊन लढू अशी भूमिका जैन यांनी घेतली होती.।विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीयेत्या १५ जानेवारीपर्यंत या बाबत पक्षश्रेष्ठींकडून निर्णय होणे अपेक्षित असून फडणवीस यांचे मेहतांशी असलेले जवळचे संबंध तसेच राज्यातील सत्ता हातून गेल्याने आता जैन यांना दिलेला शब्द पाळला जाईल याबद्दल भाजपच्या गोटातूनच साशंकता व्यक्त होत आहे.मेहतांना ओवळा माजिवडा मतदारसंघात काम करण्यास श्रेष्ठींकडून सांगण्यात आल्याचे ऐकले होते. त्यांनी तेथे काम करण्यास माझी हरकत नाही. पण मीरा- भार्इंदर मतदारसंघात व पालिकेत भ्रष्टाचारी आणि दडपशाही प्रवृतींसोबत जाणार नसल्याचे जैन यांनी म्हटले आहे. शहरातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.