शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रसार कमी करण्यात पालिकेला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 00:45 IST

पॉझिटिव्ह रुग्ण सहा टक्के : महापालिकेने मिळवले कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : तीन महिन्यांत महापालिकेने कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवले आहे. जिल्ह्यातील सर्व महापालिका मिळून जेवढ्या चाचण्या करतात, तेवढ्या चाचण्या एकट्या ठाणे पालिका क्षेत्रात होत आहेत. सर्वाधिक चाचण्या करूनही ठाण्यात पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी सहा टक्केच आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत ही सर्वात कमी टक्केवारी आहे.

गेल्या तीन महिन्यांत जीपीएस प्रणालीयुक्त असा आधुनिक नियंत्रण कक्ष, उपलब्ध असलेल्या बेडची माहिती देणारा डॅशबोर्ड, अ‍ॅपचा वापर करून एका क्लिकवर बाधित रुग्णांची संपूर्ण माहिती, कंटेनमेंट झोनचा नकाशा, चाचण्या करणारी मोबाइल व्हॅनची सुविधा आणि विशेष म्हणजे भविष्यात संख्या वाढली, तरी पुरेशी आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सुविधा आधीच निर्माण करणारी ठाणे महापालिका ही जिल्ह्यातील एकमेव महापालिका ठरली आहे. त्यामुळेच आजघडीला संपूर्ण जिल्ह्याच्या काही प्रमाणात भार ठाणे महापालिकेने उचलला असून, जवळपास ३0 टक्के इतर पालिका क्षेत्रांतील रुग्णांवर ठाणे महापालिकेकडून उपचार सुरू आहेत.

आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी २४ जून रोजी पदभार स्वीकारला, तेव्हा ठाण्याचा मृत्युदर हा पाच टक्क्यांच्या जवळपास होता. बुधवारी त्यांनी तीन महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला, तेव्हा हाच मृत्युदर तीन टक्क्यांपेक्षा खाली आहे. विशेष म्हणजे मृत्युदर कमी दाखवण्यासाठी इतर महापालिका केवळ एका महिन्याच्या मृत्युदराची टक्केवारी दाखवत असले, तरी ठाणे महापालिकेने गेल्या तीन महिन्यांतील मृत्यूची टक्केवारी प्रसिद्ध केली आहे. एका महिन्याचा विचार केला तर हा मृत्युदर केवळ एक टक्क्यावर आहे.

भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, तरी ठाणेकरांना चिंता करण्याचे कारण नाही. व्हेंटिलेटरसोबतच १५0 आयसीयूची सुविधा पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार असल्याचे डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले. पॉझिटिव्ह रुग्णांचा जूनमध्ये हिट रेट ३३ टक्क्यांवर होता, तो आता ११ टक्क्यांवर घसरला आहे. बेड उपलब्ध न होणे, उपचार न होणे, अ‍ॅम्ब्युलन्स न मिळणे अशी एकही तक्रार तीन महिन्यांत आली नाही. आयुक्तांसोबत अनुभवी अधिकारी रात्रंदिवस काम करत असल्याने हे शक्य झाले.मोफत इंजेक्शनची सुविधाठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांना रेमडेसिविरसारखे इंजेक्शन मोफत, तर पालिका क्षेत्राबाहेरील रुग्णांना मूळ किमतीत उपलब्ध केली जात आहेत. ठाण्याचा मृत्युदर तीन टक्क्यांच्याही खाली असून, मोबाइल चाचणी वाहने दोन महिन्यांपासून सर्वत्र फिरत आहेत. बाहेरून ठाण्यात येणाºया नागरिकांची चाचणी करण्यासाठी अ‍ॅण्टीजेन टेस्ट सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि अधिकाऱ्यांची अनुभवी टीम असल्याने कमी कालावधीत कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. मात्र, एवढ्यावर न थांबता चाचण्या अधिक वाढवण्यात येणार आहे. भविष्यात रुग्णसंख्या वाढली, तरी ठाणेकरांना चिंता करण्याचे कारण नाही. एकही रुग्ण उपचाराविना राहणार नाही, अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे.- डॉ. विपिन शर्मा, आयुक्त,ठाणे महानगरपालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस