शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शाळांना टाळे, सकाळी आलेल्या विद्यार्थ्यांना पाठवले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 03:18 IST

सर्वशिक्षा अभियानांतर्गत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मोहिमेसाठी चक्क पालिका शाळा बंद ठेवून ऐनवेळी शिक्षण परिषद घेतली. यामुळे सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना चक्क सुटी असल्याचे सांगून परत पाठवले.

मीरा रोड : सर्वशिक्षा अभियानांतर्गत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मोहिमेसाठी चक्क पालिका शाळा बंद ठेवून ऐनवेळी शिक्षण परिषद घेतली. यामुळे सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना चक्क सुटी असल्याचे सांगून परत पाठवले. सरकारच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाखाली शिक्षण परिषद ठिकठिकाणी राज्यात होत आहे. शैक्षणिक गुणवत्तावाढ व शाळा प्रगत करण्याचा उद्देश यामागे असला तरी मीरा- भार्इंदरमध्ये मात्र शिक्षण परिषदेसाठी चक्क शाळाच बंद ठेवण्याचा प्रकार पालिकेने केला.ही परिषद शुक्रवारी सकाळी १०.३० ते ५ पर्यंत भार्इंदरच्या नगरभवन येथील सभागृहात होती. प्रगत शाळेचा मान मिळवणारे कराड नगरपालिका शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी हे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. शिवाय, उपमहापौर चंद्रकांत वैती, शिक्षणाधिकारी बी.एस. बाबर, प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख, सर्वशिक्षा अभियानाच्या जयश्री भोईर उपस्थित होते. या वेळी मुलांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासह शाळांना प्रगत करण्यावर कोळी यांनी पालिका व अनुदानित शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन केले. या परिषदेसाठी प्राथमिक विभागाच्या महापालिकेच्या सध्याच्या ३६ शाळांमधील १८२ शिक्षक, तर अनुदानित १८ शाळांच्या सुमारे १०० शिक्षकांना गुरुवारी सायंकाळी घाईगडबडीत कळवले.आयत्यावेळी ठेवलेल्या या परिषदेमुळे सकाळी बहुतांश शिक्षक शाळांमध्ये न जाता थेट नगरभवनमध्ये हजर झाले. तर, सर्व शिक्षक हे परिषदेसाठी जाणार असल्याने शाळा बंद ठेवल्या जाणार, याची माहितीच विद्यार्थी व पालकांना नव्हती. त्यामुळे सकाळी विद्यार्थी शाळेत आले असता शाळा बंद असल्याचे सांगण्यात आले.>भोंगळ कारभाराचा नमुनामाजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी पालिकेचा अतिशय भोंगळ व बेजबाबदार कारभाराचा हा आणखी एक नमुना असल्याची टीका केली आहे. आयत्यावेळी शाळा बंद सांगून विद्यार्थ्यांना घरी पाठवणे म्हणजे शैक्षणिक नुकसानच नसून त्यांच्या सुरक्षिततेबद्दलही पालिकेला काही सोयरसुतक नाही हेच दिसते, असे ते म्हणाले.