शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केवळ सहा होर्डिंग्जला बजावल्या पालिकेने नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 01:17 IST

शौचालय बांधण्यापूर्वी उभारले होर्डिंग्जचे खांब, महासभेमुळे कारवाईची शक्यता धूसर

ठाणे : रस्ते आणि पदपथांवर शौचालये, टपऱ्या, जाहिरात फलक उभारून महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची बाब स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आल्यानंतर यावर कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी प्रशासनाला दिले होते. परंतु महासभेने यासंदर्भात ठराव केला असल्याने कारवाई करता येत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले. परंतु दुसरीकडे एका संस्थेच्या सहा होर्डिंग्जला पालिकेने नोटीस बजावली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे शौचालये आणि त्यावरील होर्डिंग्जला अभय मिळण्याची शक्यता आहे.महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि पदपथांवर कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिले होते. परंतु ठाणे महापालिका हद्दीत रस्ते, फुटपाथ, अडवून अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, शौचालये, विश्रांतीगृह अनधिकृतपणे उभारल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला होता. दुसरीकडे याबाबत सर्व्हे केल्याचा दावा यावेळी करण्यात येऊन रस्ते, फुटपाथ अडवून सुमारे २८ हजारांहून अधिक बांधकामे, होर्डिंग्ज उभारल्याचा आरोपही त्यांनी केला. तब्बल ३५०० अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचेही सदस्यांनी सांगितले होते. त्यानुसार सभापती संजय भोईर यांनी प्रशासनाची कानउघाडणी करीत अशा पद्धतीने उभारलेले होर्डिंग्ज, अनधिकृत बांधकामे, शौचालये, विश्रांतीगृह आदींवर तत्काळ कारवाई करण्याचे आणि पुढील बैठकीत याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले होते. परंतु आता याबाबत कोणताही सर्व्हे करण्यात आलेला नाही. याउलट सदस्यांनी केलेल्या मागणीनंतर एका संस्थेने सहा ठिकाणी शौचलय उभारण्यापूर्वी होर्डिंग्जचे काम केले असल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दुसरीकडे उर्वरित एकावरही कारवाई करता येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. २०१८ मध्ये यासंदर्भात महासभेत ठराव झालेला असून, तो आधी रद्द करावा लागणार आहे. त्यानंतरच याबाबत योग्य तो निर्णय घेता येईल, असेही पालिका सूत्रांनी स्पष्ट केले. पालिकेच्या जाहिरात विभागाने ही भूमिका घेतली असून, दुसरीकडे इतर बांधकामांवर किंवा फुटपाथ अडविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार हे अतिक्रमण विभागाला आहेत. त्यामुळे आता अतिक्रमण विभाग याबाबत काय पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. परंतु तूर्तास शौचालयांवर उभारलेल्या होर्डिंग्जवर कारवाई करणे शक्य नसल्याचे दिसून आले आहे. एका संस्थेने चुकीच्या पद्धतीने शौचालय उभारण्याआधी होर्डिंग्जचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना नियमानुसार नोटीस बजावली आहे.- मारुती खोडके, उपायुक्त, जाहिरात विभाग, ठामपा

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका