शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

भाईंदरमध्ये बेकायदा बांधकामासाठी पालिका पथकाला काेंडले; कारवाईला बिल्डरचा विराेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 06:35 IST

प्रवेशद्वाराला टाळे लावून अर्धा तास धरले वेठीस

मीरा रोड - भाईंदर येथील एका इमारतीत बिल्डरने केलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या सहायक आयुक्तांसह पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून अर्धा तास इमारतीच्या आवाराच्या प्रवेशद्वाराला टाळे लावून वेठीस धरल्याचा प्रकार घडला आहे. भाईंदर पोलिस ठाण्यात बुधवारी बिल्डर व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

भाईंदर पश्चिमेतील सॉलिटेअर हाइट्स या इमारतीत कल्पेश जैन व प्रकाश जैन यांनी मोकळ्या जागेत यांत्रिक पार्किंग तसेच अन्य बेकायदा बांधकाम केल्याची तक्रार आली हाेती. त्यानंतर नगररचना विभागाने मंजूर नकाशाव्यतिरिक्त बेकायदा बांधकाम झाल्याचे प्रभाग समिती १ च्या सहायक आयुक्त कांचन गायकवाड यांना कळविले. प्रभाग समितीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी बांधकाम ठिकाणी जाऊन खात्री केली असता गायकवाड यांनी कल्पेश जैन, प्रकाश जैन व  सल्लागार अभियंता मे. बी.ए.सी. प्लॅनर्स ॲण्ड इंजिनीअर्स यांना मॅकेनिकल पार्किंगचे बेकायदा बांधकाम त्वरित काढून टाकण्याची नोटीस ३० जानेवारीला बजावली होती. 

महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावत असताना बेकायदा बांधकाम करणारे आणि अन्य कोणाचेही बेकायदा प्रकार खपवून घेणार नाही. - मारुती गायकवाड, उपायुक्त, मीरा-भाईंदर महापालिका