शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शिक्षकांची होणार गुणवत्तापडताळणी; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 00:43 IST

शिक्षण विभागामार्फत २०२०-२१ या आर्थिक वर्षात पौष्टिक आहारासाठी पाच कोटी, डीबीटी अंतर्गत लाभ योजनेसाठी चार कोटी, गणवेश पाच कोटी, डिजिटल क्लासरूमसाठी ७.५० कोटी, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध योजनांसाठी १३ कोटी प्रस्तावित केले आहेत.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या २०२०-२१ च्या ३,७८० कोटींच्या मूळ अंदाजपत्रकात ठाणेकरांना नव्या कोणत्याही योजना मिळणार नसून, जुन्याच योजना पूर्ण करण्यावर भर दिला आहे. असे असले तरी आता महापालिका शाळेतील शिक्षकांची गुणवत्तातपासणी केली जाणार आहे. त्यातून जे शिक्षक यात मागे असतील त्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित केले आहे. याशिवाय टिंकरिंग लॅब, गटनिहाय विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय आणि फुटबॉल प्रशिक्षण, शिष्यवृत्ती आदी काही महत्त्वाच्या योजनांचा अंतर्भाव यात केला आहे.

शिक्षण विभागामार्फत २०२०-२१ या आर्थिक वर्षात पौष्टिक आहारासाठी पाच कोटी, डीबीटी अंतर्गत लाभ योजनेसाठी चार कोटी, गणवेश पाच कोटी, डिजिटल क्लासरूमसाठी ७.५० कोटी, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध योजनांसाठी १३ कोटी प्रस्तावित केले आहेत. विशेष म्हणजे, अशा विद्यार्थ्यांचा पट वाढविण्याबरोबर त्यांच्याकडून चांगले धडे गिरविण्यासाठी प्रयत्न करून शिक्षकांची गुणवत्तापडताळणीही केली जाणार आहे. यानुसार शिक्षकांचे विषयज्ञान व अध्यापनाची तंत्रे या दोन्ही बाबींचे ज्ञान शिक्षकांना देणे गरजेचे आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास होईल. यासाठी शासकीय यंत्रणेकडून शिक्षकांची चाचणी घेऊन तिच्या अहवालानंतर शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी ५० लाखांची तरतूद प्रस्तावित आहे.टिंकरिंग लॅब - देशात शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज (एटीएल) स्थापन करण्यात येत आहेत. याच धर्तीवर महापालिका शाळांमधील सहावी ते दहावीच्या मुलांना मनात उत्सुकता, सर्जनशीलता आणि कल्पना विकसित करण्याचा उद्देश आहे. यात विद्यार्थ्यांमध्ये डिझाइन मानसिकता, संगणकीय विचार, अनुकूल शिक्षण, भौतिक संगणना आदी कौशल्याच्या माध्यमातून नवीन वैज्ञानिक विचारांवर वाव देण्यात येणार आहे. यासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे.

गटनिहाय विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व त्यासाठी पूरकवाचनाची पुस्तके सहज उपलब्ध करून देण्यासाठी गटस्तरावर-गटशाळेत प्रत्येकी एक ग्रंथालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी २५ लाखांची तरतूद प्रस्तावित आहे.फुटबॉल प्रशिक्षण - आरोग्य सुदृढतेच्या दृष्टीने आता जास्तीत जास्त मुलांना मैदानी खेळ खेळण्याबाबत पुढाकार घेऊन फुटबॉल संघ तयार करण्यात येणार आहे. यासाठी २५ लाखांची तरतूद आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा फी, पुस्तके व मार्गदर्शन - शासनाकडून दरवर्षी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये महापालिकेच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने बसविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यानुसार यासाठी शासन फी भरणे, पूरक साहित्य पुरविण्याचे काम शिक्षण विभाग करणार आहे. यासाठी ६० लाखांची तरतूद केली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका