शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय धुणाऱ्या ठेकेदाराकडून लाच घेताना पालिकेच्या अधिकाऱ्याला अटक

By पंकज पाटील | Updated: May 8, 2023 19:49 IST

 अधिकाऱ्याला एक लाख रुपये घेताना रंगे हात पकडले

अंबरनाथ: अंबरनाथ नगर पालिकेचे आरोग्य विभागात काम करणारे स्वच्छता निरीक्षकाला ठेकेदाराकडून एक लाखाची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. शौचालय धुण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला बिल अदा करण्यासाठी या अधिकाऱ्याने तीन लाख ८० हजार रुपयाची मागणी केली होती. त्यातील एक लाख रुपये घेताना अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले आहे. 

अंबरनाथ नगरपालिकेतील सर्व शौचालयांची स्वच्छता करणाऱ्या ठेकेदाराला त्याचे गेल्या 11 महिन्यांपासून रखडलेले बिल अदा करण्यासाठी पालिकेतील स्वच्छता निरीक्षक विलास भोपी यांनी लाचेची मागणी केली होती. या बिलातील तब्बल तीन लाख 80 हजार रुपये मिळावे यासाठी या अधिकाऱ्यांने ठेकेदाराला वेठीस धरले होते. त्यातील 60 हजार रुपये या आधीच अधिकाऱ्याला देण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा एक लाख 80 हजार रुपये देण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्याने ठेकेदाराकडे केली होती.

मात्र एवढी मोठी रक्कम नसल्याने ठेकेदाराने एक लाख रुपये या अधिकाऱ्याला देण्याचे कबूल केले आणि या प्रकरणाची तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली. लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष विलास भोपे यांनी लाच स्वीकारली. याआधी देखील महिनाभरापूर्वी पालिकेच्या घरपट्टी विभागातील एका अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली होती. महिन्यात दुसऱ्यांदा ही घटना घडल्याने पालिकेत चा कारभार हा लाच घेऊनच केला जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीambernathअंबरनाथ