शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता करचा धनादेश बाऊन्स करणाऱ्या २०० जणांना पालिकेच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 22:25 IST

मीरा भाईंदर महापालिकेचा मालमत्ता कर अनेक करदाते धनादेशा द्वारे भरत असतात.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या मालमत्ता कर भरण्याचे ७५१ धनादेश बाऊन्स झाले असून त्यापैकी ५५१ जणांनी पैसे भरले आहेत. तर पैसे न भरणाऱ्या २०० जणांना धनादेश न वाटल्या बाबत गुन्हा का दाखल करू नये म्हणून नोटिसा पालिकेने बजावल्या आहेत.

मीरा भाईंदर महापालिकेचा मालमत्ता कर अनेक करदाते धनादेशा द्वारे भरत असतात. परंतु काहींचे धनादेश खात्यात पैसे नसणे वा अन्य कारणांनी धनादेश बाऊन्स होतात. त्यामुळे पालिकेला धनादेश न वाटण्याचा भुर्दंड बसून कागदोपत्री काम वाढते. तसेच त्या थकबाकीदार कडून कर वसुलीला विलंब होतो. 

पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी कर विभागाचा आढावा घेताना धनादेश न वाटलेल्या थकबाकीदारांवर  गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने कर विभागाचे सहायक आयुक्त सुदाम गोडसे व त्यांच्या कार्यालयाने धनादेश बाऊन्स झालेल्यांची माहिती तयार करण्यास घेतली होती. एकूण ७५१ धनादेश बाऊन्स झाले होते व त्याची थकीत रक्कम सुमारे १ कोटी ३९ लाख रुपये इतकी होती. त्यातील ५५१ जणां कडून कर विभागाने मालमत्ता कर ची रक्कम वसूल केली आहे. तर उर्वरित २०० जणांना नोटिसा बजावून कर दंडासह न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर