शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची धडक कारवाई, उल्हासनगरातील साडी सेंटर दुकान सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 16:04 IST

उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरात प्रसिद्ध गजानन व जपानी मार्केट असून दोन्ही मार्केट कपड्यासाठी प्रसिद्ध आहेत. लॉकडाऊन काळात दुकाने बंद असल्याने, लग्न व सणासाठी कपडे खरेदी कसे करावे?. असा प्रश्न नागरिकांना पडला,

सदानंद नाईक

उल्हासनगर - कॅम्प नं-२ गजानन मार्केट परिसरातील शगुन साडी सेंटर दुकान सताड उघडे ठेवून कपड्याची विक्री करीत असल्याची माहिती सहायक आयुक्त अजय खतूराणी यांना मिळाली. सदर घटना मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता घडली असून खतुरानी यांच्या पथकाने दुकान सील केले आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरात प्रसिद्ध गजानन व जपानी मार्केट असून दोन्ही मार्केट कपड्यासाठी प्रसिद्ध आहेत. लॉकडाऊन काळात दुकाने बंद असल्याने, लग्न व सणासाठी कपडे खरेदी कसे करावे?. असा प्रश्न नागरिकांना पडला. नागरिकांच्या गरजेचा फायदा काही दुकानदारांनी उचलला असून कोरोना नियमाचे उल्लंघन करून कपड्यासह अन्य दुकाने मागच्या दारांनी सुरू असल्याची चर्चा शहरात आहे. गजानन मार्केट परिसरातील शगुन साडी सेंटर दुकान सुरू असून कपड्याची विक्री सुरू असल्याची माहिती प्रभाग समिती क्रं-२ चे सहायक आयुक्त अजय खतुरानी यांच्या पथकाला मिळाली. मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान दुकानात धाड टाकली असता दुकानात कपड्याची विक्री होत असल्याचे चित्र होते. सहायक आयुक्त खतुरानी यांच्या पथकाने दुकानातील ग्राहकांना काढून दुकान सील केले.

शासनाच्या नियमानुसार दुकानावर कारवाई करण्याचे संकेत सहायक आयुक्त अजय खतूराणी यांनी दिले. तसेच पहाटे, सकाळी व सायंकाळी शासनाच्या कोरोना नियमाचे उल्लंघन करून दुकाने सताड उघडी ठेवणाऱ्या दंडात्मक कारवाईसह दुकाने सील करण्याचे संकेत खतुरानी यांनी दिले. कपड्यासह जीन्स, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल दुकाने मागच्या दाराने सुरू असल्याची चर्चा शहरात आहे. महापालिकेने प्रभाग निहाय भरारी पथके स्थापन करून कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलMuncipal Corporationनगर पालिका