शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील जलतरण तलावांच्या नियमावलीत पालिका करणार बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:20 IST

प्रस्ताव महासभेच्या पटलावर, शुल्क थेट पालिकेकडे भरावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून खाजगी संस्थांना तरणतलाव चालविण्यासाठी दिले जात आहेत. मात्र, या संस्था शिकाऊ सभासदांकडून जादा फी वसूल करून महापालिकेची फसवणूक करीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पालिकेने तरणतलावांच्या नियमावलीत अंशत: बदल करण्याबरोबरच संस्थांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शुल्काची रक्कम थेट महापालिकेकडे भरावी लागणार असल्याने त्याचा फायदा येथे सरावासाठी येणाऱ्या शिकाऊ सभासदांना होणार आहे.

महापालिकेच्या माध्यमातून गडकरी रंगायतन परिसरात कै. मारोतराव शिंदे आणि कळवा परिसरात कै. यशवंत रामा साळवी तरणतलाव चालविले जात आहेत. या दोन्ही तलावांचे परिचालन महापालिकेमार्फतच करण्यात येते. हे तरणतलाव जलतरण संस्थांना विशेष बॅचकरिता सवलतीच्या दरात भाड्याने देण्यात येतात. त्यासाठी एका जलतरणपटूमागे दरताशी ३० रुपये दर आकारला जातो. परंतु, या संस्थांना नवशिकाऊ सभासदांना फ्लोटद्वारे प्रशिक्षण देण्यास बंदी आहे. असे असतानाही या संस्था सवलतीच्या दरात तरणतलाव भाड्याने घेऊन नवीन सभासदांना फ्लोटद्वारे प्रशिक्षण देत असून सभासदांकडून जास्तीची रक्कम फीच्या स्वरूपात वसूल करीत होते. तक्रारी आल्यानंतर महापालिकेने अशा संस्थांना तरणतलावात प्रशिक्षण देण्यास प्रतिबंध केला होता. 

अशी आहे नवी नियमावली...nनव्या नियमावलीनुसार फ्लोटचा वापर करून सराव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक बॅचमध्ये ५० जलतरणपटूंना सराव करता येणार आहे, तसेच संस्थेला स्वत:च्या जबाबदारीवर सराव करावा लागणार आहे. अपघात झाल्यास त्यास पालिका जबाबदार असणार नाही. nविशेष बॅचसाठी भाड्याने घेणाऱ्या संस्थांना आता प्रत्येक जलतरणपटूचे जिल्हास्तरीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. नव्या सभासदांना दरमहिन्याला एक हजार रुपये आकारून महिन्याचा पास दिला जाणार आहे.