शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी महापालिकेने मागविली निविदा

By अजित मांडके | Updated: January 19, 2024 15:19 IST

बेतवडे येथील शासनाचे दोन भूखंड प्राप्त झाले आहेत, या भूखंडावर पी.पी.पी. या तत्वावर निविदा मागवून विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ठाणे : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 'परवडणारी घरे' ही योजना राबविण्यात येत असून ही योजना राबविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेस बेतवडे येथील शासनाचे दोन भूखंड प्राप्त झाले आहेत, या भूखंडावर पी.पी.पी. या तत्वावर निविदा मागवून विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार महापालिकेने आता निविदा मागिवली आहे. या पीपीपी तत्वानुसार महापालिकेने संबधीत ठेकेदाराला ३६.८५ कोटींचा विकसन खर्च हा महापालिकेस भरावा लागणार आहे.

बेतवडे येथे शासनाकडून प्राप्त झालेल्या दोन्ही भूखंडावर प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 'परवडणारी घरे' या शीर्षकाखाली आर्थिक दुर्बल घटकातंर्गत येणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रात सुमारे १४४१ लाभार्थी आहेत पैकी १२५३ लाभार्थ्यांना परवडणारी घरे अल्पदरात उपलब्ध होणार असून उर्वरित १८८ प्रकल्पबाधितांना रुपये दोन लक्ष इतका आर्थिक हिस्सा अदा करुन सदनिका उपलब्ध असणार आहे. या सदनिका ३० चौ.मी चटईक्षेत्र इतक्या मोजमापाच्या असतील. त्यानुसार आता या कामाची निविदा पी.पी.पी. तत्वावर काढण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले होते. त्यानुसार महापालिकेने आता या कामाची निविदा मागविली आहे.

निविदाकार १४४१ सदनिकांपेक्षा अधिक सदनिका (पाच वर्षाच्या देखभाल व दुरूस्तीसह) त्याचे स्वखचार्ने महापालिकेस बांधून देईल अशा विकासकासाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यामध्ये विकासकास उर्वरित चटईक्षेत्रामध्ये नियमानुसार सदनिका व गाळे तयार करुन व्यावसायिक विक्री करण्याची मुभा राहिल असाही निर्णय महापालिकेने घेतला आहे.'परवडणारी घरे' या योजनेतंर्गत बांधण्यात येणाºया सदनिकांना केंद्रशासनामार्फत प्रति सदनिका रुपये दीड लाख तर राज्यशासनामार्फत रुपये १ लाख याप्रमाणे अनुदान प्राप्त होणार आहे.

तसेच या योजनेतील महत्वाची बाबी या योजनेत ३० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या १४४१ सदनिका विकासकाला बांधून द्याव्या लागणार आहेत. तसेच या प्रकल्पाकरीता येणारा विकसन खर्च ३६.८५ कोटी महापालिकेला डेव्हल्पमेंट चार्ज म्हणून द्यावे लागणार आहेत.

भुखंडनिहाय एकूण क्षेत्रफळाच्या १० टक्के क्षेत्रफळ हे ओपन स्पेसेस रोड्स, आरजी आदी करीता राखून ठेवून उर्वरीत ९० टक्के क्षेत्रफळापैकी सुमारे ४८.३० टक्के क्षेत्रफळावर ए.एच.पी. घरे, एम.आय.जी. घरे- व्यावसायिक गाळे, आरक्षित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

एकूण बांधण्यात येणाºया सदनिका पैकी ६.३१ टक्के सदनिका (१८८) या प्रकल्पातील बाधींतासाठी ४१.९९ टक्के सदनिका परवडणाºया घरांसाठी पात्र बाधितांसाठी व सेल कॅम्पोनेन्टमध्ये ५०.५० टक्के सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी व १.२१ टक्के व्यावसायिक गाळे (७८ वाणिज्य गाळे) उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

बेतव्े सर्व्हे क्र. ७८ साठी २.५ टक्के अधिक ६० टक्के अ‍ॅसिलरी व बेतवडे सर्व्हे क्र.१५/१ साठी २.२५ टक्के अधिक ६० टक्के अ‍ॅसिलरी या प्रमाणे चटई क्षेत्रफळाचा वापर करुन पार्कींगसह १६ व २२ मजल्याच्या आरसीसी पध्दतीच्या बहुमजली इमारती व अंतर्गत पायाभुत सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.परवडणाºया घरांची विक्री देखील प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार समाज विकास विभाग ठामपा यांच्याकडून डिमांड सर्व्हे करुन केले जाणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे