शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांना पालिकेने घातली पुन्हा निर्बंधांची वेसण, आयुक्तांनी घेतली बैठक; नियम मोडले तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 10:20 IST

या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले तर त्या आस्थापना सील करून जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नाही तोपर्यंत सील काढणार नसल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी स्पष्ट केले.

ठाणे : राज्य शासनाने कोरोनाबाबत पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. यानुसार ठाण्यातील हॉटेल, बार, मल्टिप्लेक्स व इतर आस्थापना रात्री ११.३० पर्यंत सुरू  राहणार आहेत, तर दुकाने ९.३० पर्यंत खुली ठेवण्याच्या सुचना आहेत. या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले तर त्या आस्थापना सील करून जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नाही तोपर्यंत सील काढणार नसल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी स्पष्ट केले. या मार्गदर्शक सूचनांचे पालन ३१ मार्चपर्यंत बंधनकारक आहे महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना यापूर्वी जे नियम आखले होते, तेच आताही लागू असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांनी बुधवारी हॉटेल, बार, मल्टिप्लेक्स, दुकाने, बाजारपेठांमधील प्रतिनिधी आदींसह इतर आस्थापनांची बैठक घेतली. यावेळी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी नियमांचे पालन केले जाईल, असे स्पष्ट केल्याचे आयुक्तांनी सांगितले. मल्टिप्लेक्स, मॉल, हॉटेल, बार आदी ठिकाणी ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त गर्दी नसावी, मास्कशिवाय परवानगी नाही, प्रत्येकाचे तापमान तपासणे, लक्षणे असणाऱ्यांना प्रवेश नाही,  सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांकृतिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.

गृह विलगीकरणासाठी निर्बंधांसह परवानगीस्थानिक प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली गृहविलगीकरण करण्यात येईल. १४ दिवसांसाठी ते असल्याचे फलक संबंधित घरांवर व इमारतींच्या प्रवेशद्वारावर लावले जाणार आहे. कोराेना पॉझिटिव्ह रुग्णाच्या हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का मारला जाणार असून,  त्याच्या घरातील इतर सदस्यांनी बाहेर जाणे टाळावे व मास्कचा वापर करावा, या आदेशाचे उल्लंघन केल्यास गृहविलगीकरण केलेल्या व्यक्तिला तत्काळ कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.

अंत्यविधीसाठी २०, तर लग्नासाठी ५० व्यक्तीयापूर्वी लग्न समारंभासाठी १०० माणसांना परवानगी दिली जात होती. परंतु, आता ती ५० माणसांनाच असणार आहे. तसेच अंत्यविधीसाठीही २० माणसांचीच परवानगी असणार आहे. 

अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनांत ५० टक्के उपस्थितीआरोग्य सेवा व इतर अत्यावश्यक सेवावगळता इतर खासगी किंवा शासकीय कार्यालयांमध्येही पूर्वीप्रमाणे ५० टक्के उपस्थिती ठेवावी लागणार आहे. त्यातही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची जबाबदारी संबंधीत आस्थापनाने घ्यावी. तसेच धार्मिक स्थळांच्या ठिकाणीदेखील ऑनलाइन बुकिंग करून दर्शन घ्यावे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका