शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

मनपा आयुक्त जयस्वालांनी ‘करून दाखवले’ पण बोडकेंचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 05:10 IST

ठाणे महापालिकेत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवून ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांविरोधात ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने कारवाईचे अस्त्र उगारले आहे

प्रशांत माने, कल्याण

ठाणे महापालिकेत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवून ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांविरोधात ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने कारवाईचे अस्त्र उगारले आहे. ठाणे महापालिकेने अशा २३ संशयित खंडणीखोर माहिती अधिकार कार्यकर्त्यांची यादीच पोलिसांकडे सादर केली आहे. ही कारवाई चांगलीच गाजत असताना केडीएमसीमधील चित्र वेगळे नाही. ही महापालिका भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी नेहमीच चर्चेत असते. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी खंडणी मागितल्याच्या घटना येथेही घडलेल्या आहेत. यात संबंधितांविरोधात अटकेची कारवाई झाली आहे. काही अपवादवगळता अशा माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा केडीएमसीला विळखा पडला आहे. मात्र, ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याप्रमाणे केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके हे ‘माहिती अधिकार कायद्या’च्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणाºयांविरोधात कारवाईचे धाडसी पाऊल उचलणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

नागरिकांचे सबलीकरण करण्याच्या दृष्टीने आणि सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणण्याच्या हेतूने २००५ साली माहितीच्या अधिकाराचा कायदा संमत करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कायद्याच्या केलेल्या मागणीचा मुख्य उद्देश हा ‘भ्रष्टाचाराचे निर्मूलन’ हाच होता. पण, आजघडीला हा उद्देश बाजूला राहिला आहे. हा चांगला कायदा आहे. यातून अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. परंतु, प्रत्येक कायद्याचे जसे फायदे असतात, तसे तोटेही असतात. या कायद्यामुळे एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत असताना दुसरीकडे काहीजणांनी माहितीचा अधिकार हे स्वयंरोजगाराचे साधन बनवले आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दैनंदिन कारभारात या कायद्याचा बडगा दाखवत हस्तक्षेप होऊ लागला. त्यामुळे हा अधिकार ‘तारक की मारक? अशी चर्चा आहे. कल्याणमध्ये जानेवारी महिन्यात घडलेल्या एका खंडणी प्रकरणातून माहितीच्या अधिकाराचा कसा दुरुपयोग होतो, हे अनुभवास मिळाले. ठाकुर्ली-चोळेगाव परिसरात राहणाºया एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी स्वीकारताना कथित महिला पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्तीला ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल ५० लाख रु पयांची खंडणी मागितली होती. तडजोडीत २५ लाख देण्याचे ठरले होते. यातील काही रक्कम स्वीकारताना तिला अटक झाली. तिच्या केडीएमसी मुख्यालयातील लॉकरची तपासणी केली असता यामध्ये सुमारे चार लाखांपर्यंतचे न वटलेले ३० ते ३५ धनादेश, माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांची कागदपत्रे, बेकायदा बांधकामांसंदर्भात केलेल्या पत्रव्यवहारांच्या प्रती मिळून आल्या. माहिती अधिकार कायद्याचा स्वहितासाठी कसा वापर केला जात होता, हे या प्रकरणातून उघड झाले. यापूर्वीही असेच खंडणीचे प्रकार कल्याणमध्ये घडले आहेत.अडीच वर्षांपूर्वी कल्याणमधील एका साप्ताहिकाच्या संपादकाला खंडणी प्रकरणात अटक झाली होती. परंतु, अशा प्रवृत्तीच्या लोकांना याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याने काही दिवस सरताच असे महाभाग उजळ माथ्याने वावरतात. महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला असताना आजवर किती भ्रष्टाचाराची प्रकरणे संबंधित माहिती अधिकाºयांनी या कायद्याद्वारे धसास लावली, हा संशोधनाचा विषय आहे. छोटे कंत्राटदारही या ‘अधिकाराचा’ सर्रास वापर करून आपल्या न मिळालेल्या कामांमध्ये खोडा घालण्याची कामे हल्ली करत आहेत. काम न देणाºया अधिकाºयांना अर्ज करून त्रास देण्याच्या करामती सर्रास सुरू आहेत. यामुळे अधिकारीवर्ग पुरता धास्तावला आहे. काही अधिकाºयांनी माहिती अधिकार कार्यकर्ते पोसण्याचे काम केले आहे. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून इतर अधिकाºयांना त्रास देण्याचे कारस्थान काही मोजके अधिकारी करत आहेत.ठाण्यातील काही कथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा उपद्रव रोखण्याकरिता ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठोस पावले उचलली. कल्याण-डोंबिवली महापालिकेतही माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा उपद्रव आहे. काहींना खंडणी वसुलीकरिता अटक झाली आहे. मात्र, या महापालिकेत काही वरिष्ठ अधिकाºयांनीच माहिती अधिकारी पोसले असून ते अन्य अधिकाºयांवर सोडले जातात. आयुक्त गोविंद बोडके अशा तोतया माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर व त्यांच्या गॉडफादर असलेल्या अधिकाºयांवर कारवाई करून दाखवणार का?

 

टॅग्स :tmcठाणे महापालिकाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका