शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्तांनी देखील पोटनिवडणुका रद्द करण्याची केली निवडणूक आयोगास विनंती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 15:29 IST

पुढील वर्षी होणारी सार्वत्रिक निवडणूक आणि आचार संहिता आदी कारणे आयुक्तांनी नमूद केली आहेत. 

मीरारोड - भाईंदर व मीरारोड येथील दोन रिक्त जागां करिता होणाऱ्या पोटनिवडणुका रद्द करण्याची विनंती खुद्द महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना केली आहे . पालिकेवर पडणारा खर्चाचा बोजा , पुढील वर्षी होणारी सार्वत्रिक निवडणूक आणि आचार संहिता आदी कारणे आयुक्तांनी नमूद केली आहेत. 

भाईंदर पूर्व येथील शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर यांचे गेल्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले तर मीरारोड मधील काँग्रेस नगरसेविका उमा सपार यांचे काही महिन्या पूर्वी आजारपणा मुळे निधन झाले असल्याने ह्या ४ नगरसेवकांच्या प्रभागातील प्रत्येकी १ जागा रिक्त झाली. 

पुढील वर्षी ऑगस्ट मध्ये महापालिकेची मुदत संपणार असल्याने त्या आधी सार्वत्रिक निवडणुका घ्याव्या लागणार आहेत . तसे असताना निवडणूक आयोगाने ह्या दोन जागां साठी पोटनिवडणूकच्या अनुषंगाने मतदार यादी व मतदान केंद्र अंतिम करण्यासाठी आदेश दिल्याने पालिका कामाला लागली आहे. 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आधीच आचार संहिते मुळे कामांवर होणारा परिणाम आणि अत्यल्प काळासाठी नगरसेवक पद राहणार असल्याने पोटनिवडणुकीला विरोध करत ती रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगास केली आहे. तर आता खुद्द महापालिका आयुक्तांनीच निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक रद्द करण्याचे साकडे घातले आहे . 

मीरा भाईंदर महानगरपालिकेची मुदत २७ ऑगस्ट २०२२ रोजी संपत असून फक्त ९ महिने राहिले आहेत. सध्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून त्या नंतर निवडणूक कार्यक्रम घोषीत होईल जो साधारण २५ ते ३० दिवसांचा असेल. सार्वत्रिक निवडणूकीकरीता जवळपास दिड ते दोन महिने कालावधी हा आचारसंहितामध्ये जाणार आहे.सध्या महानगरपालिकेमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दती असल्याने प्रभागाती ल एक सदस्याची जागा जरी रिक्त झाली तरी अन्य उर्वरीत ३ सदस्य संबंधित प्रभागातील जनतेचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने प्रभागातील नागरीकांची गैरसोय होत नाही.

नजिकच्या काळात सार्वत्रिक निवडणूक येऊ घातल्याने पुन्हा अतिशय कमी कालावधी करीता होणाऱ्या पोटनिवडणुकीकरीता महानगरपालिकेचा निवडणुकीवरील खर्च अनाठायी होणार आहे . तसेच कोविड विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपला नसल्याने कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करता पोटनिवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात यावा असे पालिकेचे मत असल्याचे आयुक्त ढोले यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक