शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

भिवंडीतील वऱ्हाळ तलावाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ; तलावावर पसरला हिरवा तवंग , कुजक्या दुर्गंधीने नागरीक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 15:31 IST

Bhiwandi News : भिवंडी शहराचा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर शहराच्या पर्यटनदृष्टीने त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या शहरातील वऱ्हाळादेवी तलावावर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला असून तलावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे

नितिन पंडीत  - 

भिवंडी - भिवंडी शहराचा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर शहराच्या पर्यटनदृष्टीने त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या शहरातील वऱ्हाळादेवी तलावावर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला असून तलावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे मनपा आयुक्त निवासाबरोबरच माजी उपमहापौर तसेच नगरसेवकांच्या घराशेजारी असलेल्या या तलावाकडे लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे . विशेष म्हणजे तलावात पसरलेल्या हिरव्या तवंगामुळे व कचऱ्यामुळे तलाव परिसरात पसरलेल्या कुजक्या दुर्गंधीमुळे कामतघर , वऱ्हाळादेवी नगर , फेणे गाव व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे या तलावातून शहरातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील केला जात आहे . मात्र आता या तलावात पसरलेल्या दुर्गंधीमुले शहरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे या तलावाच्या बाजूला खेळाचे मैदान व मनशांती साठी मनपा प्रशासनाने पीस पार्क बनविला असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला येत असतात . मात्र आता येथे पसरलेल्या दुर्गंधीने नागरिकांनी येथे येण्यासाठी पाठ फिरवली आहे.  

 भिवंडी शहरातील जुन्या नागरी वस्तीत नगरपरिषद असल्या पासून या तलावातून शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या या वऱ्हाळ तलावांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने याठिकाणी कपडे धुणे, वाहन धुणे हे नेहमीचे झाले आहे . काही वर्षांपूर्वी या तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च देखील केला आहे . मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांसह सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी केला आहे मात्र मनपा प्रशासनाने नागरिकांच्या कोणत्याही तक्रारीची दाखल घेतली नाही . कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील या तलावाची अवस्था बिकट झाली असल्याने कामतघर परिसरातील नागरीक हैराण झाले आहेत. या तलावातून जुन्या भिवंडी शहरातील मंडई, गौरी पाडा ,वाणी आळी, ब्राह्मण आळी ,सौदागर मोहल्ला ,तांडेल मोहल्ला या भागात दररोज २ एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे . त्यातच कोट्यवधींचा खर्च करून या तलावात ठिकठिकाणी विसर्जन घाट बांधण्यात आले आहेत . मात्र सध्या या विसर्जन घाटांची दुरवस्था झाल्याने या विसर्जन घाटासाठी अडविलेल्या पाण्यातील प्रदूषण सर्वदूर पाण्यात पसरल्याने सुमारे ८ एकर क्षेत्रफळातील या तलावाच्या पाण्यावर हिरवा तेलकट तरंग साचला असून या तलावातील पाण्याला उग्र दर्प येत आहे. 

 विशेष म्हणजे दुर्गंधी पसरलेल्या या तलावाच्या भागातच महापालिका प्रशासनाने कोविड प्रतिबंधित लस टोचण्यासाठी तसेच कोविड तपासणी केंद्र स्थापन केले आहे. त्यामुळे येथे नेहमीच नागरिक व अत्यावश्यक सेवेतील कामगार लस टोचण्यासाठी व रक्त तपासणीसाठी येत आहेत . मात्र तलावाच्या पसरलेल्या दुर्गंधीमुळे येथील वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह नागरिकांना दुर्गंधीचा मोठा सामना करावा लागत असून परिसरातील नागरिकांना येथील दुर्गंधीमुळे भविष्यात आजार निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र एवढे सर्व घडूनही महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष कधी देणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येत आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीच या तलावाच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च केला असून आता या हिरव्या तवंग व दुर्गंधीच्या आड मनपा प्रशासनातील भ्रष्ट मनोवृत्ती पुन्हा तलाव सुशोभीकरणाच्या व सफाईचा नावाखाली स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पुन्हा या तलावाच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून स्वतःचे खिशे भरण्याची वाट तर पाहत नाहीत ना असा सवाल येथील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

 दरम्यान मागील दहा बारा वर्षांपूर्वी मनपा प्रशासनाने या तलावाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे आठ ते दहा कोटींचा खर्च केला आहे ज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे , आम्ही येथील स्तहनिक नागरिक आहोत आम्हला मनपाच्या भ्रष्टाचाराशी काही देणे घेणे नाही मात्र आता या तलावाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे व येथे पसरलेल्या दुर्गंधीमुळे आम्ही फार हैराण झालो आहोत , मागील एक डिड महिन्यांपासून आम्हाला हा त्रास होत आहे मात्र अनेक तक्रारी करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे . येत्या सात दिवसांच्या आत या तलावाची साफ सफाई झाली नाही तर आम्ही मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन व उपोषण करू अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक रहिवासी ऍड मुकेश नवगिरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी