शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा अपघात: अभियंत्यांच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी; हलगर्जीपणाचा आरोप वकिलांनी फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 10:47 IST

गर्दीमुळेच मुंब्रा येथील रेल्वे अपघात झाल्याचाही केला दावा

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुंब्रारेल्वे अपघात प्रकरणातील समर यादव आणि विशाल डाेळस या दाेन अभियंत्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवार, ११ नाेव्हेंबर राेजी हाेणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचा अहवाल आणि रेल्वे पाेलिसांचा अहवाल तपासून त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे शुक्रवारी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश गणेश पवार यांनी स्पष्ट केले. दोन्ही अभियंत्यांवरील अटकेची टांगती तलवार कायम आहे. 

मुंब्रा-दिवा या अप आणि  डाऊन मार्गांवर ९ जून २०२५ राेजी झालेल्या अपघाताच्या वेळी कसारा ते सीएसएमटी अप आणि सीएमएमटी ते कर्जत या दाेन्ही उपनगरी रेल्वेतून नऊ प्रवासी खाली पडले हाेते. यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले हाेते. या अपघाताची रेल्वेच्या दाेन अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा तब्बल पाच महिन्यांनी १ नाेव्हेंबर २०२५ राेजी दाखल झाला.  अभियंत्यांनी देखभालीच्या कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवला. रूळ वेल्डिंग करणे अपेक्षित हाेते, तिथे पट्टी लावून बाेल्ट लावले, अशा तांत्रिक त्रुटी व्हीजेटीआयच्या अहवालात हाेत्या. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.  

गर्दीमुळेच मुंब्र्यात अपघात

  • पावसामुळे ट्रॅकखाली खडी वाहून गेली, अभियंत्यांनी रूळ वेल्डिंग करणे अपेक्षित हाेते, तिथे पट्टी लावून बाेल्ट लावले, हाच हलगर्जीपणा अपघाताचे कारण असल्याचे व्हीजेटीआयच्या अहवालात नमूद केले होते. 
  • गर्दी नियंत्रित ठेवणे हे पाेलिसांचे कर्तव्य असून, फूट बाेर्डवर उभे राहून प्रवास करणे गुन्हा असल्याचा मुद्दा आराेपींचे वकील बलदेवसिंग राजपूत यांनी मांडला.  अपघातानंतर आणि आधी दिवसभरात सुमारे २०० रेल्वे गाड्या त्याच मार्गावरून गेल्या.
  • हलगर्जीपणा झाला असता तर अन्य रेल्वेतील प्रवाशांनाही त्याचा फटका बसला असता. हा अपघात प्रवाशांच्या गर्दीमुळे झाल्याचा युक्तिवाद ॲड. राजपूत यांनी केला. रेल्वेचे काम सुरू राहण्यासाठी त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी ॲड. राजपूत यांनी केली.

‘निवृत्त न्यायाधीशांमार्फत मुंब्रा दुर्घटनेची चौकशी व्हावी’

मध्य रेल्वेवर ९ जून रोजी झालेल्या मुुंब्रा रेल्वे दुर्घटनेची पुढील चौकशी निष्पक्ष होण्यासाठी ती निवृत्त न्यायाधीश समितीमार्फत व्हावी, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाकडून करण्यात येत आहे. यासंबंधित पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष लता अरगडे यांनी सांगितले. मुंब्रा दुर्घटने प्रकरणी दाखल गुन्ह्याविरोधात रेल्वे कर्मचारी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गुरुवारी आंदोलन केले. परिणामी दोन प्रवाशांचा निष्पाप जीव गेला.

दरम्यान, प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेटण्यास नकार देत विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना यांच्याकडे पाठवल्याचे त्यांनी सांगितले. मीना यांनाही दुर्घटनांची निवृत्त न्यायाधीश समितीमार्फत चौकशीचे निवेदन दिल्याचे लता अरगडे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbra Accident: Engineers' bail hearing Tuesday; negligence charge denied.

Web Summary : Mumbra rail accident: Engineers' bail hearing set for Tuesday. Defense denies negligence, citing overcrowding. Inquiry demanded by passenger association.
टॅग्स :mumbraमुंब्राTrain Accidentरेल्वे अपघातCourtन्यायालय