शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या खाजगीकरणाविरोधात आज मुंब्रा, कळव्यात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:53 IST

टोरंट कंपनीला विरोध : ठाण्यात काढणार सर्वपक्षीय मोर्चा

ठाणे : टोरंट कंपनीविरोधात शनिवारी कळवा, खारीगाव, पारसिकनगर, मुंब्रा, दिवा, शीळ, देसाईगाव येथे बंदची हाक देऊन पारसिकनगर ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष या मोर्चासाठी आग्रही असले तरी येथील बऱ्याच नागरिकांना सुरळीत वीज मिळणार असेल, तर हे खाजगीकरण आवश्यक वाटत आहे. कळवा-मुंब्य्रात राष्ट्रवादीचे नगरसेवक जास्त असून आगामी निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीमध्ये या मोर्चाबाबत शंका उपस्थित होत आहे.

वीजवितरण व वीजबिलवसुलीसाठी टोरंट या खाजगी कंपनीला राज्य शासनाने कंत्राट दिले आहे. २६ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. या कंपनीमुळे सर्वसामान्य ग्राहकाला वीजबिलाचा मोठा भुर्दंड बसणार असून शासनाच्या महसुलातही मोठ्या प्रमाणात तूट येणार आहे. भिवंडी शहरातील टोरंट या कंपनीच्या कारभाराचा वाईट अनुभव असल्याने कळवा, खारीगाव, पारसिकनगर, मुंब्रा, दिवा, शीळ, दिवागाव, देसाई आणि परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी समन्वय समिती स्थापन केली आहे. तिच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत या परिसरात बंद पाळण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता याविरोधात पारसिक बँकेच्या मुख्य कार्यालय येथील ९० फूट रोड ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. तो शांततेत काढावा व कायदा सुव्यवस्था राखावी, असे आवाहन दशरथ पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी हा मोर्चा लक्षात घेऊन त्याच्या मार्गातील वाहतुकीत बदल केला आहे. मुंब्रा बायपास तसेच मुंब्रा परिसरातून खारेगाव-कळवा रोडमार्गे शिवाजी चौकाकडे येणाºया सर्व वाहनांना पारसिक रेतीबंदर रोड येथे प्रवेशबंदी करून ती सरळ खारेगाव टोलनाकामार्गे पुढे नेण्याबाबत पर्यायी मार्ग सुचवला आहे. याव्यतिरिक्त आणखी आवश्यक बदल केल्याचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.कडेकोट बंदोबस्तमोर्चात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून साध्या वेशातील पोलीसही तैनात राहणार आहेत. हा मोर्चा सर्वपक्षीय असल्याने त्यास मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे.ठाणे ग्रामीण पोलीस अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ३० जानेवारी रोजी रात्री १२ पर्यंत कुठल्याही प्रकारची शस्त्रे बाळगण्यास तसेच पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन, तसेच विविध आंदोलने लक्षात घेऊन हा आदेश जारी केला आहे.रिक्षा बंदबाबत निर्णय नाहीरात्री उशिरापर्यंत बंदला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय येथील प्रमुख रिक्षा संघटनेने घेतला नव्हता. रिक्षा चालू ठेवायची की बंद, याचा वैयक्तिक निर्णय घेण्याची मुभा रिक्षाचालकांना देण्यात आली आहे, अशी माहिती न्यू मुंब्रा आॅटो रिक्षा युनियनचे सचिव बाळासाहेब मुळीक यांनी दिली.

टॅग्स :electricityवीज