शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

त्या लोकलला कॅमेरे नाहीत, सीसीटीव्ही फुटेजही नाही, अपघात कसा झाला हे शोधण्याचं रेल्वेसमोर आव्हान

By अनिकेत घमंडी | Updated: June 11, 2025 12:48 IST

Mumbra Local Accident: मुंब्य्रात सोमवारी लोकलमधून १४ प्रवासी पडून झालेल्या दुर्घटनेच्या मूळ कारणाचा शोध रेल्वे पोलिस व प्रशासन यांनी सुरू केला. अपघात झालेल्या लोकल जुन्या असल्याने त्यांच्या मोटरमन, गार्ड कोचसमोर कॅमेरे बसवलेले नसल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली. त्यामुळे अपघात नेमका कसा घडला, याचा शोध लावण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली/ठाणे - मुंब्य्रात सोमवारी लोकलमधून १४ प्रवासी पडून झालेल्या दुर्घटनेच्या मूळ कारणाचा शोध रेल्वे पोलिस व प्रशासन यांनी सुरू केला. अपघात झालेल्या लोकल जुन्या असल्याने त्यांच्या मोटरमन, गार्ड कोचसमोर कॅमेरे बसवलेले नसल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली. त्यामुळे अपघात नेमका कसा घडला, याचा शोध लावण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे. जेथे अपघात घडला, त्या भागाची कसून पाहणी करण्यासाठी ठाणे लोहमार्ग पोलिसांचे पथक अहोरात्र तैनात केले होते. मंगळवारी दिवसभरात त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. 

अपघातात जखमी सात प्रवाशांवर ठाण्यात उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री उशिरा आणखी एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याने जखमींची संख्या आठ झाली. जखमींपैकी मच्छिंद्र गोतारणे या रुग्णाला मेंदूचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. तीन रुग्णांवर मंगळवारी हाडाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

लोखंडी रॉडचा फटका बसला?एका लोकलमधून लोखंडी रॉड लागल्यामुळे अपघात झाला असावा, अशी चर्चा काही प्रवाशांत सोमवारपासून सुरू होती. त्यातील एका लोकलच्या डब्याला ओरखडे असल्याची चर्चा होती. तसेच ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणच्या फलाटाचा शेवटचा भाग खचल्याची चर्चा सुरू होती. मात्र, रेल्वे पोलिसांनी या चर्चेला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

मोटरमन, ५० प्रवाशांची चौकशीअपघात झाला त्या लोकलच्या दोन्ही मोटरमन, गार्ड यांना मध्य रेल्वेच्या वरिष्ठांनी मुंबईत बोलवून त्यांच्याकडून माहिती घेतल्याचे सांगण्यात आले. दोन्ही लोकलमधील ५० प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचीही रेल्वेने मंगळवारी दिवसभर चौकशी करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. 

अपघात घडल्यापासून तो कसा घडला असावा, यासाठी आरपीएफ, जीआरपी पोलिस यंत्रणेकडून त्याचा तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींसमवेत चर्चा करून माहिती घेणे सुरू असून, फलाटातील कॅमेरे तपासण्यात आले, त्यातून फारसे काही स्पष्ट झाले नाही, यंत्रणांचा तपास सुरू आहे. - अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणे जीआरपी

रूळ, स्लीपर, खडी : हालचालींवर लक्षपोलिसांनी प्रत्यक्षदर्शींकडे विचारपूस केली. रेल्वे रुळात, त्या भागात, संबंधित लोकल गाड्यांमध्ये  तांत्रिक दोष होता का, याची तपासणी रेल्वे वरिष्ठ पातळीवर करत आहे. मंगळवारी दिवसभर मुंब्रा स्थानकात प्रचंड पोलिस फौजफाटा तैनात केला होता. दिवसभरात जलद मार्गाने जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांचा व लोकलचा वेग ताशी ३० ते ५० किमी एवढा नियंत्रित ठेवला होता. त्या वेगावर नियंत्रण ठेवून रुळ, खडी, स्लीपरच्या हालचालींवर लक्ष देण्यात आले होते. स्थानकातील कॅमेरे पोलिसांनी तपासले. परंतु त्यातून फारसे हाती लागले नाही. दोन लोकलच्या मधल्या भागात प्रवासी पडल्याने आणि त्या लोकल एकमेकांसमोरून गेल्याने फलाटावरील सीसीटीव्हीत अपघात चित्रित झाला नाही. 

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेAccidentअपघात