शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मुंब्रा बायपासवर जाळपोळ, आव्हाडांविरोधातील विनयभंगाच्या गुन्ह्याविरोधात निदर्शनं

By कुमार बडदे | Updated: November 14, 2022 10:42 IST

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने आपल्यावर हा दुसरा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

मुंब्राः  

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने आपल्यावर हा दुसरा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आव्हाड यांच्या या ट्विटचे पडसाद त्यांचा मतदार संघ असलेल्या मुंब्र्यात लगेच उमटले असून संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी मुंब्रा बायपासवर सकाळीच जाळपोळ केली आहे. सकाळीच हा प्रकार झाल्याने बायपासवर वाहतूक कोंडी झाली होती.दरम्यान आता बायपास वाहतुकिसाठी खुला करण्यात आला आहे.

मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा; नेमकं घडलं काय? वाचा...आव्हाड यांच्या  विरोधात ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कारणामुळे ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले म्हणत आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. मी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत. ट्वीटद्वारे त्यांनी तशी घोषणा केली आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार आहे. मी लोकशाहीची हत्या झालेली पाहू शकत नाही, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.आव्हाडांच्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झाले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड