शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

मुंब्रा बायपास मंगळवारपासून दोन महिने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:56 AM

मुंब्रा बायपास येत्या मंगळवारपासून तब्बल दोन महिने बंद राहणार आहे. त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाने मुहूर्त काढल्यानंतर ठाणे शहर वाहतूक शाखेने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.

ठाणे : मुंब्रा बायपास येत्या मंगळवारपासून तब्बल दोन महिने बंद राहणार आहे. त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाने मुहूर्त काढल्यानंतर ठाणे शहर वाहतूक शाखेने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.याचा परिणाम ठाणे आणि नवी मुंबईच्या वाहतुकीवर होण्याची शक्यता असल्याने जेएनपीटी येथून निघणाऱ्या १०० टक्के वाहतुकीपैकी ८० टक्के वाहतूक तेथेच थांबवली जाणार आहे. २० टक्के वाहतूक या कालावधीत सोडली जाणार आहे. तसेच दुरुस्ती कामामुळे वाहतूकमार्गात केलेल्या बदलांमुळे वाहनचालकांमध्ये गोंधळ होऊ नये, यासाठी माहितीपत्रके आणि टोकनचे वाटप जेएनपीटीकडून वाहनचालकांना केले जाणार असून यामध्ये वाहतुकीचा मार्ग, वाहतुकीची वेळ अशी माहिती असणार आहे. दरम्यान, टोकनवर दिलेल्या वेळेचे पालन न करणाºयावर कारवाई केली जाणारअसल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.मुंब्रा बायपाससंदर्भात आता वाहतूक शाखेच्या अधिकाºयांनी सर्व पर्यायी मार्गाचा अभ्यास केला असून आता येत्या २४ एप्रिलपासून या कामाला सुरु वात होणार आहे. तब्बल दोन महिने हे काम सुरू राहणार असून त्यासाठी मुंब्रा बायपास पूर्णत: वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्याच्या दुरूस्तीमध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचे बांधकाम, बेअरिंग मजबूत करणे आणि बदलणे, काही डेस्कलॅब तोडून नवीन बांधणे ही कामे केली जाणार आहेत. हा रस्ता मुख्यत: जेएनपीटीकडून येणाºया आणि जाणाºया अवजड वाहतुकीसाठी वापरला जातो. सोबत ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मुंबईला जाण्यासाठीदेखील चारचाकी आणि दुचाकी वाहनचालक याचा वापर करतात.या सर्वांना दोन महिने याचा फटका बसणार आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने वेगवेगळ्या मार्गांवरून ही वाहने वळवली आहेत. मुंब्रा वाय जंक्शन ते रेतीबंदर असे सात किलोमीटर रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. केवळ लहान वाहनांना मुंब्रा शहरातून प्रवेश दिला जाणार असून मुंब्रा बायपासवर केवळ बायपासच्या कामाच्या संदर्भातील गाड्यांना सोडले जाणार आहे. त्यांना विशेष मार्किंग केले जाणार आहे. याशिवाय, जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाºया अवजड वाहनांना शहरातून सोडले जाणार आहे. ठाणे आणि नवी मुंबईचा वाहतुकीचा भार कसा कमी होईल, यादृष्टीने विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे उपायुक्त काळे यांनी सांगितले.एकच टोल भरावा लागणार - पालकमंत्रीमुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीत बदल केला आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक दोन टोल भरण्याची वेळ ओढवली आहे. मात्र, ती वेळ येणार नसल्याचे स्पष्ट करून वाहनचालकांकडून ऐरोली किंवा आनंदनगर जकात या दोन टोलनाक्यांपैकी एकाच नाक्यावरून टोल वसूल करावा, अशा सूचना दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (महामंडळ) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.२४ तास काम राहणार सुरूमुंब्रा बायपासच्या कामाला दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून ते पूर्ण करण्यासाठी २४ तास काम करण्यात येणार आहे. यामध्ये डेस्कलॅब तोडून नवीन बांधणे आणि बेअरिंगचे काम करण्यात येणार आहे पावसापूर्वी हे काम संपवावे, अशा सूचना पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.300 पेक्षा अधिक फौजफाटा तैनातया कामाच्या दरम्यान वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांसह वॉर्डन अशी तीनशेपेक्षा अधिक जणांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. गरज भरल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वाढवण्यात येणार असल्याचे उपायुक्त काळे यांनी सांगितले.

बंद पडणारी वाहने तत्काळ हलवणारया कामादरम्यान, एखादे वाहन बंद पडल्यास त्याला १० मिनिटांत हटवण्याचे नियोजन वाहतूक शाखेने केले आहे.त्यासाठी त्यांनी काही विशेष ठिकाणे निश्चित केली असून तेथे चार मोठ्या तर २८ छोट्या क्रेन सज्ज ठेवल्या आहेत. तसेच मुंब्य्रासाठी ठामपाकडे एक मोठी क्रेन मिळावी, अशी मागणी केली आहे.तसेच या कालावधीत रस्त्यांवर धावणारे वाहन बंद पडू नये, यासाठी त्याची तपासणी करूनच ते रस्त्यावर उतरावे. याची काळजी घ्यावी, अशी सूचना वाहतूक असोसिएशनला केल्याचे काळे यांनी सांगितले.एक महिन्यानंतर कोपरी पुलाचे कामजवळपास एक महिन्यानंतर कोपरी पुलाचे काम हाती घेतले जाणार आहे. तत्पूर्वी या पुलाच्या समांतर असलेले सर्व्हिस रोड सक्षम करून त्यामार्गे वाहतूकसुरळीत ठेवली जाणार आहे. त्यासाठी महापालिका बाराबंगला सर्व्हिस रोडचे तसेच तुळजा भवानीजवळील रोडचे काम पूर्ण केले जाणार आहे.दररोज १० ते १५ हजार कंटेनरची वर्दळमुंब्रा बायपासवरून साधारणत: दररोज १० ते १५ हजार कंटेनरची वर्दळ सुरू असते. तसेच या बासपासचे काम सुरू होण्यापूर्वी वाहतूक विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी जवळपास एक हजार एक किलोमीटर प्रवास केला आहे.त्यानंतरच पर्यायी मार्ग निश्चित केला आहे. तसेच याचदरम्यान, बायपासवरून येजा करणारी (दोन आणि चारचाकी) हलकी वाहने मुंब्रा शहरातून जातील. तसेच मुंब्य्रातील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिका आणि पोलिसांमार्फत क ारवाई हाती घेण्यात येणार आहे.जेएनपीटीवर वाहतूक पोलिसांची भिस्तजेएनपीटी येथून सुटणाºया जड-अवजड वाहनांसाठी एक फॉर्म्युला तयार केला आहे. त्याप्रमाणे वाहने बाहेर पडल्यास तर वाहतूक सुरळीत राहील. अन्यथा, या दोन महिन्यांत ठाणे शहरातील वाहतूककोंडीचे तीनतेरा वाजण्याची शक्यता आहे.असा करण्यात आला आहे वाहतुकीमध्ये बदलजेएनपीटी-नवी मंबई -दक्षिण भारतात पुणेमार्गे - कळंबोली सर्कल-नवीन मुंबई - तळोजामार्गे येथून नाशिक, गुजरात, भिवंडी येथून उत्तर भारतात जाणाºया अवजड वाहनांना कल्याणफाटा आणि शीळफाटामार्गे मुंब्रा बायपासमार्गे जाण्यास नो-एण्ट्री केली आहे.पर्यायी मार्गजेएनपीटीकडून - नवी मुंबईकडून नाशिक दिशेने जाणाºया जड आणि अवजड वाहनांसाठी जेएनपीटी पॉइंट, पळस्पा, डावीकडे वळण घेऊन जुन्या मुंबई रोडने चौकगाव, चौकफाटा, त्यानंतर डावीकडे वळण घेऊन कर्जत, मुरबाड, डावीकडे वळण घेऊन सरळगाव, डावीकडे वळण घेऊन किन्हवलीमार्गे शहापूरवरून राष्ट्रीय महामार्ग ३ वरून नाशिक किंवा नाशिकच्या दिशेने इच्छितमार्गे जाऊ शकतात, ही वाहतूक २४ तासांसाठी खुली राहणार आहे .जेएनपीटी-नवी मुंबई येथून भिवंडीकडे जाणारी अवजड वाहने रात्री ११ ते ५ या कालावधीत जेएनपीटी, कळंबोली सर्कल, तळोजा, कल्याणफाटा याठिकाणी उजवीकडे वळण घेऊन कल्याण शीळ रोडने काटई, पत्रीपूल, कल्याण दुर्गाडी सर्कल पूल, कोनगाव, रांजनोली नाक्यावरून राष्ट्रीय महामार्ग ३ वरून भिवंडीकडे जाता येणार आहे.नवी मुंबईकडून उरणफाटामार्गे महापे सर्कलकडून शीळफाटामार्गे गुजरातकडे जाणाºया वाहनांना उजवीकडे वळण घेऊन शीळफाट्याकडे येण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे.रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत महापे सर्कल येथून डावीकडे वळण घेऊन हॉटेल्स पोर्टिका सरोवरसमोरून उजवे वळण घेऊन रबाळे एमआयडीसीमार्गे रबाळेनाका, ऐरोली पटनी सर्कल, डावीकडे वळून ऐरोली सर्कल, उजवीकडे वळण घेऊन मुलुंड, ऐरोली पुलावरून ऐरोली टोलनाकामार्गे उजवीकडे वळण घेऊन पूर्वद्रुतगती मार्ग मूलुंड आनंदनगर टोलनाक्यावरून घोडबंदर रोडने गुजरातच्या दिशेने जातील.राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८ - अहमदाबाद गुजरातकडून जेएनपीटी नवी मुंबईकडे व पुणेमार्गे दक्षिण भारतात जाणाºया अवजड वाहनांसाठी मुंब्रा बायपास वापरणे २४ तासांसाठी बंदी घातली आहे.टेंननाका वसईमार्गे वाकोडा टोलप्लाझा, वाडागाव याठिकाणी उजवीकडे वळण घेऊन, कवाड टोलनाका, नदीनाका पुलावावरून डावीकडे वळण घेऊन चाविंद्रा, वडापा, मुंबई-नाशिक हायवेवरून उजवीकडे वळण घेऊन पुढे येवाईनाका याठिकाणी डावीकडे वळण घेऊन - पाइपलाइनमार्गे, सावध चौक - उजवीकडे वळण घेऊन गांधारी पुलावरून - आधारवाडी सर्कल- उजवीकडे वळण घेऊन दुर्गाडी पत्रीपूलमार्गे टाटा हाउस - बदलापूर चौक येथून डावीकडे वळण घेऊन खोणी सर्कलमार्गे उजवीकडे वळण घेऊन तळोजामार्गे एमआयडीसी नावडाफाट्याकडून डावीकडे वळण घेऊन कळंबोली सर्कलवरून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत इच्छास्थळी पोहोचतील.चिंचोटी येथून जेएनपीटी येथे भिवंडी, नारपोलीमार्गे जाणारी वाहने पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत बंद राहणार आहे. परंतु, चिंचोटीवरून नारपोली-भिवंडी परिसरात येणाºया अवजड वाहनांना मालोडी टोलनाकामार्गे पूर्णवेळ अंजूरफाटा येथे प्रवेश देण्यात येत आहे.भिवंडीकडून जेएनपीटी नवी मुंबईकडे जाणाºया अवजड वाहनांना मुंब्रा बायपासमार्गे जाण्यास बंदी करण्यात आली आहे.भिवंडीकडून जेएनपीटी किंवा पुणेमार्गे जाणाºया जडअवजड वाहनांना माणकोली जंक्शन - नाशिक मुंबई हायवे - रांजणोली नाका - किन्हवली - सरळगाववरून उजवीकडे वळून मुरबाड, कर्जत - चौकनाका येथे इच्छितस्थळी जातील.वर्सोवाकडून जेएनपीटी नवी मुंबई व दक्षिण भारतात जाणाºया अवजड वाहनांना रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत प्रवेश देण्यात येत असून वाघोडबंदर रोडने कापूरबावडी - कोपरी पूल - मुलुंड चेकनाका - ऐरोली टोलनाका मार्गे - ऐरोली टोलनाकामार्गे ऐरोली सर्कल - डावीकडे वळण घेऊन पटनी जंक्शन - उजवीकडे वळण घेऊन रबाळेनाका, महापे सर्कल - उरणफाटा येथे इच्छितस्थळी जातील.घोडबंदर रोडने गुजरातकडून नवी मुंबई जेएनपीटीकडे येणाºया व नवी मुंबई जेएनपीटी घोडबंदर रोड मुरबाडकडे जाणाºया अवजड वाहनांना दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत आनंदनगर चेकनाकामार्गे जेएनपीटी गुजरातकडे येजा करतील.रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत भिवंडीवरून माणकोलीनाका, डावीकडे वळून मुंबई-नाशिक हायवे - रांजणोलीनाका - येवाईनाका उजवीकडे वळून - सावध चौक - गांधारी पूल - आधारवाडी - दुर्गाडी सर्कल - पत्रीपूल - बदलापूर चौक - काटई चौक - उजवीकडे वळून तळोजा एमआयडीसी - कळंबोली सर्कल या पर्यायी रस्त्यावरून इच्छितस्थळी जातील .

टॅग्स :thaneठाणे