शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, ठाण्यात चो-या करणारे अट्टल चोरटे जेरबंद : साडेचार लाखांचे सोने हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 21:53 IST

दिवसाढवळया चोरी करणा-या चौकडीपैकी दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने जेरबंद केले आहे. त्यांनी मुंबई ठाणे परिसरात अनेक चो-या केल्याची कबूली दिली.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईवागळे इस्टेटमधील १९ लाखांचे ७३ तोळे सोनेही चोरलेदिवसाढवळया चोरी करण्याची ‘एमओबी’

ठाणे : ठाण्यासह मुंबईतील उपनगरांमध्ये दिवसाढवळ्या चो-या करणा-या चौकडीपैकी लोकनाथ आरमुरगम शेट्टी (२२) आणि राजेश शेट्टी (४२) या अट्टल चोरट्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे साडेचार लाखांचे सोनेही हस्तगत केले असून वागळे इस्टेट भागातील १९ लाखांच्या चोरीचीही त्यांनी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.वागळे इस्टेट, श्रीनगर भागातील ‘शुभलक्ष्मी’ या इमारतीमधील मोहन पाटील यांच्या घरातून १८ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चोरी झाली होती. यात पाटील यांच्या घरातून ४५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीची भांडी आणि ७० हजारांची रोकड असा १२ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास केला होता. त्याच इमारतीमधील मोहनलाल जैन यांच्या घरातूनही २८ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सात लाख ६३ हजार ५०० चा ऐवज चोरीस गेला होता. जैन यांच्या घरासमोरील भारती शर्मा यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला होता. एकाच दिवशी १९ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांप्रमाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाकडूनही तपास सुरूहोता. खबरी आणि काही तांत्रिक माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे आणि श्रीनिवास तुंगेनवार यांच्या पथकाने २९ डिसेंबर २०१७ रोजी लोकनाथ आणि राजेश या दोघांची मुंबईच्या विलेपार्ले भागातून धरपकड केली. दोघेही मूळचे चेन्नईतील असून त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाड्यातील एक, विलेपार्ले पोलीस ठाण्यात चार आणि श्रीनगरमधील १८ डिसेंबरच्या या चार चो-यांचीही कबुली या दोघांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुरुवातीला ३ जानेवारी आणि आता ८ जानेवारीपर्यंत या दोघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर अधिक तपास करत आहेत.दिवसाढवळ्या चोरी करायचे...राजेश शेट्टी आणि त्याच्या साथीदारांचा दिवसाढवळ्या चोरी करण्यात हातखंडा आहे. एखाद्या सोसायटीमधील लॉक असलेली सदनिका आधीच हेरून ठेवायची. नंतर, दोघांनी पाळत ठेवून उर्वरित दोघांनी लॉक तोडून घरात शिरून चोरी करून पसार व्हायचे. त्यांच्या आणखी दोघा साथीदारांचा शोध सुरू असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

टॅग्स :thaneठाणेPolice Stationपोलीस ठाणेcrimeगुन्हे