शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसात मुंबई, ठाणे पोलिसांनी चिमुकलीसाठी ग्रीन कॉरिडॉर केला; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 22:40 IST

चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांची धडपड

मुंबई: मुसळधार पाऊस सुरू असताना आणि त्यामुळे झालेली वाहतूककोंडी अशा आव्हानात्मक परिस्थितीत पोलिसांनी एका चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर केला. मुंबई आणि ठाणे पोलिसांनी ताळमेळ साधून ग्रीन कॉरिडॉर यशस्वी करण्याची संपूर्ण तयारी केली. मात्र चिमुकलीचा जीव वाचू शकला नाही. जिविता नाडर या अवघ्या साडेतीन वर्षांच्या बालिकेला डोंबिवलीच्या एस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. जिविताचं फुफ्फुस निकामी झाल्याचं निदर्शनास आलं. तिला महालक्ष्मी येथील बालरुग्णालयात तात्काळ हलविणं आवश्यक होतं. मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू होता. सर्वत्र वाहतूक कोंडी असल्यानं तिला रुग्णालयात कसं न्यायचं असा प्रश्न पडला होता. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि मुंबईच्या वाहतूक विभागाचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी ग्रीन कॉरिडारची तयारी दाखवली. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही ठाण्यात उपायुक्त अमित काळे यांनी ग्रीन कॉरिडॉर निर्माण केला. पोलीस हवालदार पारधी मुसळधार पावसात समन्वय साधत होते. तर मुंबईत सहायक आयुक्त विनायक वत्स यांनी आपले पथक तयार ठेवलं होतं. मुंबई आणि ठाण्याच्या वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षांनी ग्रीन कॉरिडॉरची संपूर्ण तयारी केली होती. सुसज्ज अ‍ॅम्बुलन्समधून जिविताला नेण्यात येणार होतं. पण त्याआधीच तिची प्रकृती ढासळली आणि तिनं प्राण सोडला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल