शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संचालकांच्या अपहरणात मुंबईच्या हवालदाराचा समावेश; २५ लाख जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 05:31 IST

उदयपूर (राजस्थान) येथील खासगी वित्त संस्थेकडे मोठे कर्ज मागण्याच्या बहाण्याने दोन संचालकांचे अपहरण करून २५ लाखांची खंडणी उकळण्याचा डाव ठाणे खंडणीविरोधी पथकाने उधळून लावला.

ठाणे : उदयपूर (राजस्थान) येथील खासगी वित्त संस्थेकडे मोठे कर्ज मागण्याच्या बहाण्याने दोन संचालकांचे अपहरण करून २५ लाखांची खंडणी उकळण्याचा डाव ठाणे खंडणीविरोधी पथकाने उधळून लावला. लेनीन कुट्टीवट्टेसह सहा जणांना अटक करून २५ लाखांची रोकड, तलवार हस्तगत केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली. आरोपींत तुकाराम मुदगन हा मुंबईचा पोलीस हवालदारही आहे.उदयपूरच्या ‘श्री तिरुपती फायनानिक्स निधी लिमिटेड’ या कंपनीकडे लेनीन आणि त्याच्या साथीदारांनी मालमत्तेच्या तारणावर मोठे कर्ज मागितले. मालमत्ता व मूळ कागदपत्रे दाखवण्याच्या बहाण्याने देवानंद वरंदानी आणि रोनक सैनी (रा. दोघेही उदयपूर, राजस्थान) या दोन्ही संचालकांना ठाण्यात बोलावले. त्यांचे ७ सप्टेंबरला अपहरण केले. तलवारीच्या धाकावर, मारहाण करून एक कोटीची खंडणी मागितली. ठार करण्याची धमकी दिली. देवानंद यांनी अखेर २५ लाख देण्याचे मान्य केले. उदयपूर येथून त्यांचा साथीदार पैसे घेऊन आला. देवानंद यांच्या मित्राने ही माहिती ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना दिली. पोलिसांनी सापळा लावून अपहरणकर्त्यांची गाडी कल्याणमधून ८ सप्टेंबरला पकडली. गाडीतून एका अपहृत संचालकाची सुटका केली. तर, लेनीन आणि शेलार यांना २५ लाखांच्या रोकड आणि कारसह अटक केली.>१५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीलेनीन, शेलारच्या चौकशीतून अन्य एका संचालकाची हाजीमलंग रोड येथील घरातून सुटका केली. तेथून सागर साळवे, ओमप्रकाश जैस्वाल, अभिषेक झा, पोलीस हवालदार तुकाराम मुदगन यांना अटक केली. साळवेसह चौघांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

टॅग्स :thaneठाणे