शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई उच्च न्यायालयाने परिवहन सेवा महापालिकेनेच चालवण्याचे दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 19:48 IST

ठेकेदाराची पाठराखण करणाऱ्या सत्ताधारी भाजपाला धक्का 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा महापालिकेने चालवावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिल्याने परिवहन सेवा चालवणारा ठेकेदार आणि त्याची सातत्याने बाजू घेणाऱ्या सत्ताधारी भाजपाला धक्का मानला जात आहे . तर महापालिकेने स्वतः बससेवा चालवण्यास सुरवात केल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे . 

 

कोरोनाच्या संसर्गाच्या अनुषंगाने नागरिकांच्या सेवेसाठी परिवहन सेवा सुरु करा असे पालिकेने ठेकेदार मे. भागीरथी एमबीएमटी यांना सातत्याने सांगून देखील ठेकेदाराने मात्र बस सेवा सुरु केली नव्हती . जेणे करून नागरिकांचे प्रचंड हाल होत होते . तर ठेकेदार सह सत्ताधारी भाजपा कडून मात्र पुरवणी करारनामा करून अधिकचे पैसे देण्यात यावे अशी मागणी व ठराव केले जात होते . 

 

दुसरीकडे सदर ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याला काळ्या यादीत टाका आणि बस सेवा पालिकेनेच चालवावी अशी मागणी आमदार गीता जैन व प्रताप सरनाईक आदींनी चालवली होती . ठेकेदाराने बससेवा सुरु न केल्याने आयुक्त डॉ . विक्रम राठोड यांनी ठेकेदाराचा ठेका रद्द केला . परंतु पालिकेने बससेवा मात्र सुरु न केली नाही . ठेकेदाराने उच्च न्यायालयात धाव घेतल्या नंतर न्यायालयाने ठेकेदारास पोलीस संरक्षण देऊन बससेवा सुरु करण्याचे आदेश दिले . 

 

ठेकेदाराने बससेवा सुरु केली होती . न्यायालयाने ठेकेदारास नव्याने याचिका करण्यास सांगून मुदत दिली होती . ती मुदत १७ डिसेम्बर रोजी संपत असल्याने ठेकेदाराने १५ रोजी नव्याने याचिका दाखल केली होती . परंतु १८ डिसेम्बर रोजी न्यायाधीश रियाज चागला व एस . जे . काथावाला यांच्या खंडपीठ समोर सुनावणी झाली असता न्यायालयाने बस पुढील व्यवस्था होई पर्यंत पालिकेने बस सेवा चालवावी असे आदेश दिले . 

 

न्यायालयाच्या आदेशा नुसार पालिकेने रोजंदारीवर तात्पुरते २४५ कर्मचारी घेऊन ९ बस मार्गांवर ४६ बस चालवत आहे . पालिका नव्याने ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया करणार असल्याचे उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले . पुढील सुनावणी ११ जानेवारी रोजी होणार आहे . 

 

 २०१९ पासून परिवहन सेवेचा ठेका मे. भागीरथी एमबीएमटी ला दिला आहे .  पालिका व सत्ताधारी भाजपाने ठेकेदारावर इतकी मेहेरबानी केली आहे कि विचारता सोया नाही . ठेकेदारास बस महापालिकेने फुकट दिल्या आहेत .आधुनिक बस डेपो फुकट दिला आहे . बसच्या तिकिटाचे आणि जाहिरातीचे उत्पन्न सुद्धा ठेकेदारच घेणार आहे . इतके करून देखील ठेकेदारास प्रति किमी मागे २७ रुपये प्रमाणे पालिका पैसे देखील देत आहे . त्या व्यतिरिक्त परिवहन समितीने तर ठराव करून ठेकेदाराला कोरोना संसर्गा आधीचे तिकीट उत्पन्न ग्राह्य धरून आताच्या उत्पन्ना वर फरकाचे लाखो रुपयांची रक्कम सुद्धा दिली असल्याचा आरोप आमदार गीता जैन यांनी केला आहे . 

 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक