शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सूतिकागृह होणार मल्टिस्पेशालिटी, केडीएमसीकडून निविदा प्रक्रिया लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 03:07 IST

पूर्वेत असलेले केडीएमसीचे सूतिकागृह काही वर्षांपासून बंद आहे. याठिकाणी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.

- अनिकेत घमंडीडोंबिवली  - पूर्वेत असलेले केडीएमसीचे सूतिकागृह काही वर्षांपासून बंद आहे. याठिकाणी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी लवकरच निविदा (एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट) मागवण्यात येणार आहेत. सोमवारपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाने याचा आराखडा तयार केला असून राज्यातील सर्वोत्तम रुग्णालय करण्याचा मानस आहे. तळघर अधिक ११ मजल्यांचे बांधकाम करण्यासाठी सुमारे २८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याव्यतिरिक्त रुग्णालयातील अन्य आवश्यक सुविधांसाठी वेगळा निधी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी प्रस्ताव मिळाल्यानंतर त्यांची छाननी करून जास्तीतजास्त सुविधा देणाऱ्या संस्थेला हा प्रकल्प महापालिका देईल. या प्रकल्पासाठी महापालिकेच्या आजी व माजी वैद्यकीय अधिकाºयांनी प्रकल्प विभागाला मार्गदर्शन केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार, तयार आराखडा हा महापालिकेच्या नगररचना विभागाकडून तत्त्वत: मंजूर करून त्यानुसार मूळ बांधकामाच्या प्राकलनाची अंदाजे किंमत काढण्यात आल्याचेही सांगण्यात आले.प्रस्ताव आल्यानंतर ते अंतिम मंजुरीसाठी महासभेसमोर सादर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. तसेच हा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. तळघर ते पहिले चार मजले हे रुग्णालय असणार आहे. अन्य मजल्यांवर डॉक्टरांसाठी क्वॉर्टर्स, नर्स क्वॉर्टर्स आदींसह अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता करावी, अशी अपेक्षा विशेष प्रकल्प विभागाने केली आहे.असा असेल प्रकल्पपूर्वेकडील टिळक पथाजवळील मुख्य रस्त्यालगत हा भूखंड आहे. एकूण ३३०० चौरस मीटरच्या जागेमध्ये दोन एफएसआय मिळून हे अद्ययावत रुग्णालय बांधण्याचा महापालिकेचा विचार आहे. त्यामध्ये १० हजार चौरस फुटांवर बांधकाम अधिक वाहनतळ सुविधा तसेच रुग्णालयाला आवश्यक यंत्रसामग्रीची सुविधा त्यात असेल.या प्रकारची सुविधा देण्याचा मानस असलेल्या संस्थांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. चार ते पाच हजार चौरस फुटांमध्ये सूतिकागृह बांधण्यात येणार आहे. उर्वरित जागा मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आणि त्यासाठी आवश्यक सुविधांसाठी मिळणार आहे. तळमजल्यावर पार्किंग सुविधा उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :thaneठाणे