शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

अखेर ११ वर्षांनी मिळाला मुहूर्त

By admin | Updated: March 2, 2016 01:55 IST

सॅटीस प्रकल्प राबवण्यापूर्वी प्रस्तावित असलेल्या कोर्ट नाका ते स्टेशनपर्यंतच्या डीपी रोडच्या रुंदीकरणाला अखेर ११ वर्षांनंतर महापालिकेला मुहूर्त सापडला असून मंगळवारपासून या कारवाईस सुरवात झाली.

ठाणे : सॅटीस प्रकल्प राबवण्यापूर्वी प्रस्तावित असलेल्या कोर्ट नाका ते स्टेशनपर्यंतच्या डीपी रोडच्या रुंदीकरणाला अखेर ११ वर्षांनंतर महापालिकेला मुहूर्त सापडला असून मंगळवारपासून या कारवाईस सुरवात झाली. पहिल्याच दिवशी तळ अधिक दोन मजल्याच्या कोहिनूर इमारतीसह जवळपास ४५५ बाधित बांधकामे आणि बिल्डिंगलाईन वाढविलेली शेड्स तोडण्यात आले. या कारवाईला तेथील व्यावसायिकांपासून नागरिकांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला. तर एका ८० वर्षाच्या वृद्धाने चक्क आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस उपआयुक्त सचिन पाटील यांच्यासह सर्वानाच चॉकलेट वाटून या कारवाईचे आगळेवेगळे स्वागत केले. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनीही हात उंचावून या कारवाईस पाठिंबा दर्शविला. तर महापालिका आयुक्तांनी तब्बल तीन तास पायी चालत संपूर्ण स्टेशन परिसर पिंजून काढला. तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या काळात पहिल्यांदा ठाणे शहराने मोकळा श्वास घेतला होता. स्टेशन परिसर मोकळा करण्याचे पहिले धाडस चंद्रशेखर यांनीच केले. मात्र त्यानंतर शहराचा वाढलेला विस्तार आणि वाढती प्रवासी संख्या यामुळे ठाणे स्टेशन परिसरात पुन्हा वाहतूककोंडीला ठाणेकरांना तोंड द्यावे लागत आहे. ती सोडवण्यासाठी २००६ साली नेताजी सुभाष पथ ( स्टेशन रोड ) या ठाणे महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील १८ मीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानंतर २००७ साली झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये देखील सुभाष पथ येथील सिद्धिविनायक मंदिर ते अमेरिकन वॉच कंपनी दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करण्याचा प्रस्ताव होता. (प्रतिनिधी)एसटी स्टँडपासून पुढे कोहिनूर इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सुमारे २० ते २५ दुकान गाळे तोडण्यात आले. जनरल पोस्ट आॅफीस ते अलोक हॉटेल पर्यंत जी बांधकामे बिल्डींग लाईनच्या बाहेर केली होती, ती जवळपास ६० बाधित बांधकामे तोडली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे असलेल्या हॉटेल रिजन्सीचे शेड्स त्याचप्रमाणे मंगला चेंबर्स ते हॉटेल अलोक या दरम्यान दुकानांच्याबाहेरील जवळपास ६० शेड्सही तोडण्यात आल्या. यावेळी स्टेशनच्या बाहेरील तळ अधिक दोन मजल्याची कोहिनूर इमारतही तोडण्याची कारवाई करण्यात आली. याबाबतीत वारंवार सुचना देऊनही संबधितांनी कुठलीच कार्यवाही केली नसल्याने आणि ती अतिधोकादायक असल्याने कधीही कोसळून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई केली. ही इमारत तोडल्यामुळे सॅटीसकडून स्टेशनकडे जाण्यासाठी एकमार्गी स्वतंत्र मार्गिका तयार होणार आहे.यावेळी महापालिका आयुक्तांनी राघोबा शंकर रोडवरील वाढीव अनधिकृत बांधकामधारकांना ८ दिवसाची मुदत दिली असून ८ दिवसात त्यांनी स्वत:हुन वाढीव बांधकामे तोडण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही कारवाई उपआयुक्त अतिक्र मण अशोक बुरपल्ले, परिमंडळ २ चे उपआयुक्त संजय हेरवाडे, नगर अभियंता रतन अवसरमोल, उपनगर अभियंता राजन खांडपेकर, शहर नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, सहाय्यक आयुक्त मंगल शिंदे, कार्यकारी अभियंता हातीम अली यांनी १०० महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने केली.सकाळी १० वाजता कडेकोट पोलिस बंदोबस्तात महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोककुमार रणखांब यांच्या उपस्थितीत कारवाईस सुरु वात झाली. ४ जेसीबी, १ पोकलेन मशीनद्वारे ती करण्यात आली. या कारवाईअंतर्गत सुभाष पथावरील जनता फॅशन हाऊस ते अशोक टॉकीज पर्यंत बिल्डींग लाईन सोडून केलेली जवळपास ३०० वाढीव बांधकामे हटविली. त्याचप्रमाणे एसटी स्थानकाच्या बाहेर अनधिकृतपणे बांधलेले ८ ते १० दुकान गाळे तोडण्यात आले.