शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ठाण्यातील लघुउद्योगांना महावितरणचा ‘लॉकडाऊन शॉक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:36 IST

एमआयडीसीनेही पाण्याची सरासरी बिले लाखांच्या घरात पाठवली आहेत. त्यामुळे कामगारांचे पगार द्यायचे की बिले भरायची, असा पेच त्यांना पडला आहे.

अजित मांडके ठाणे : लॉकडाऊ नमुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. जूनमध्ये लॉकडाऊ न शिथिल केल्यानंतर यातून सावरताना तीन महिन्यांनंतर लघुउद्योग सुरू झाले. या कालावधीत बंद असलेल्या कंपन्यांना सरासरी २० ते २५ लाखांची बिले पाठवली आहेत. एमआयडीसीनेही पाण्याची सरासरी बिले लाखांच्या घरात पाठवली आहेत. त्यामुळे कामगारांचे पगार द्यायचे की बिले भरायची, असा पेच त्यांना पडला आहे.एमआयडीसीतील ३,४१९ आणि एमआयडीसीच्या पट्ट्याबाहेरील ३१२६ उद्योगांना परवानगी दिली आहे. २१ मार्चनंतर जूनमध्ये यातील ५० टक्के उद्योग सुरू झाले आहेत. तेथे २० टक्केच काम होत आहे. मात्र, त्यांना लागणारा कच्चा मालही मिळत नाही आणि बाजारातून मागणीही नाही. त्यामुळे उद्योजकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यातही कामगारही येण्यास तयार नाहीत. जे येत आहेत, त्यांना खबरदारी घेऊन काम करावे लागत आहे. अत्यावश्यक सेवेत न मोडणारे उद्योग आजही बंद असल्याने साहित्य मिळत नाही. त्यामुळे जादा पैसे मोजावे लागत आहेत. वाहतूकदार एक हजाराच्या भाड्यासाठी चार ते पाच हजार रुपये आकारत आहेत. शिवाय, मार्केटमधून आॅर्डर नसल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातच आता उद्योगधंदे सुरू केल्यानंतर महावितरणनेही या उद्योगांना सरासरी बिल पाठवून मोठा शॉकच दिला आहे. तीन महिन्यांत वीजवापरच झालेला नसताना महावितरणने सरासरी २० ते २५ लाखांचे बिल पाठवले आहे. ही भरमसाट बिले भरायची कशी, असा सवाल उद्योजक करत आहेत. एमआयडीसीनेही उद्योगांना पाण्याची सरासरी बिले लाखांत पाठविल्याने तोंडचे पाणी पळाले आहे.>लघुउद्योग संघटनांची शुक्रवारी उद्योगांच्या समस्यांबाबत बैठक झाली असून या बैठकीत अत्यावश्यक सेवेबरोबर इतर सेवेतील उद्योगांनाही परवानगी द्यावी. उद्योगधंदे सुरू ठेवता येतील, तेवढा बाजारात कच्चा माल उपलब्ध करून द्यावा, अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.- संदीप पारीख,उपाध्यक्ष, चेंबर आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशन>जूनमध्ये उद्योग सुरू केले आहेत. पण, हे बंद असल्यासारखेच आहेत. माल उचलला जात नाही. मार्केटमध्ये जे साहित्य आवश्यक आहे, ते उद्योग आजही बंद आहेत. त्यामुळे काम कसे करायचे, असा पेच आहे.- ए.वाय. अकोलावाला, मानद सहसचिव,ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन>महावितरणने एकेका उद्योजकाला तीन महिन्यांचे २० ते २५ लाखांचे बिल पाठवले आहे. एमआयडीसीनेही पाण्याचे सरासरी लाखांत बिले पाठविली आहेत. तीन महिने वापरच झाला नाही, तर बिले एवढी आलीच कशी?- एकनाथ सोनावणे, कार्यकारी सचिव, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन