शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

पालकमंत्र्यांसह खासदार-आमदार रात्रभर घटनास्थळी!

By admin | Updated: July 30, 2015 02:05 IST

ठाकुर्लीची घटना समजताच सर्वप्रथम आमदार रवींद्र चव्हाण यांनी धाव घेऊन जमावाला शांत करण्यासह ढिगारा बाजूला करण्यासाठी आवाहन केले. त्यापाठोपाठ पालकमंत्री एकनाथ शिंदे

डोंबिवली : ठाकुर्लीची घटना समजताच सर्वप्रथम आमदार रवींद्र चव्हाण यांनी धाव घेऊन जमावाला शांत करण्यासह ढिगारा बाजूला करण्यासाठी आवाहन केले. त्यापाठोपाठ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास येऊन सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. मंगळवारी रात्रभर ते त्या ठिकाणी तळ ठोकून होते. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊ चौधरी, स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे, नगरसेवक दीपेश म्हात्रे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. भाजपाचेही डोंबिवली पूर्व अध्यक्ष शशिकांत कांबळे, संजीव बिडवाडकर, स्थानिक नगरसेवक श्रीकर चौधरी, एनसीपीचे राजू शिंदे, मनसेचे कार्यकर्ते आदींनीही येत सहकार्य केले. रहिवाशांशीही शिंदे यांनी संवाद साधला, तर स्थानिक आमदार म्हणून चव्हाण यांना तेथील रहिवासी परिचित असल्याने त्यांना भेटत सर्वांनीच तक्रारी-सल्ले दिले. एकामागून एक येणाऱ्या अफवांनी आणि सूचनांनी मदतकार्यात अडथळा येत होता. बघ्यांचीही गर्दी होती. त्यामुळेही काही काळ अडचणी आल्याचे निदर्शनास आले. पहाटे दीडनंतर पहिल्या फळीत असलेल्या चव्हाण यांनी डीसीपी संजय जाधव यांच्याशी संवाद साधत मदतकार्य तेजीने होणे आवश्यक असल्याचे म्हटले. तर, शिंदे यांनी इमारतीबाहेरील हमरस्त्यावर थांबत गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांचे व तक्रारी सांगणाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पहाटे ३ च्या सुमारास त्यांच्यासह खासदारांनी शास्त्रीनगर रुग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. पहाटे ६ च्या सुमारास त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत परतीचा मार्ग धरला. ठाकुर्लीची घटना पाहता अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचे जीव महत्त्वाचे असून आता अशा अतिधोकादायक इमारतींवर हातोडा घालण्याची कार्यवाही जोमाने सुरू केली जाईल. त्याचबरोबर क्लस्टर डेव्हलपमेंट लागू करण्यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल. - कल्याणी पाटील, महापौर केडीएमसीधोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत चालला असून यावर ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे. आयुक्त ई. रवींद्रन आणि महापौर कल्याणी पाटील यांच्याकडे विशेष महासभा लावण्याची मागणी करण्यात आली असून यासंदर्भात शासनस्तरावरदेखील तत्काळ कार्यवाही होणे अपेक्षित आहे.- विश्वनाथ राणे, विरोधी पक्षनेते, केडीएमसीशहराच्या दृष्टीने ही घडलेली अत्यंत दुर्दैवी आणि डोळे उघडणारी घटना आहे. ज्या काही धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होणार आहे, त्याबाबतीत योग्य त्या उपाययोजना महापालिका आणि राज्य शासन यांनी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ज्या अतिधोकादायक इमारती आहेत, त्या तातडीने निष्कासित करणे आवश्यक आहे. - राहुल दामले, उपमहापौर पावसाळी अधिवेशन सुरू असून सभागृहात कल्याण-डोंबिवली परिसरात क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आवाज उठवण्यात येईल. स्थानिक आमदारांशीही यासंदर्भात चर्चा झाली असून आयुक्तांशी विशिष्ट धोरण निश्चित करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. - एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्वत: फोन करून करत स्थिती जाणून घेतली. ज्यांचा मृत्यू झाला, जे जखमी झाले, त्यांची माहिती घेतली. सभागृहात ४ एफएसआयला येथे मान्यता द्यावी, तसेच धोकादायक-अतिधोकादायक इमारतींबाबत धोरण निश्चित करून येथील सामान्यांना न्याय द्यावा. - रवींद्र चव्हाण, आमदार, भाजपा ‘ते’ ठरले रिअल हीरोएकीकडे अग्निशामक दल आणि आपत्कालीन पथक बचाव कार्याला जुंपले असताना दुसरीकडे शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतकार्याला हातभार लावून माणुसकीचे दर्शन घडविले. आमदार रवींद्र चव्हाण, भाऊसाहेब चौधरी, मनोज घरत, राजेश कदम आणि राजेश शिंदे या राजकीय पदाधिकाऱ्यांमधील ‘कार्यकर्ता’ ठाकुर्ली दुर्घटनेत दिसून आला.केडीएमसीचे लीडिंग फायरमन म्हणून जून महिन्यात निवृत्त झालेले सदाशिव माने हेदेखील तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशामक दलासोबत त्यांनीही अहोरात्र काम केले. धनंजय चाळके या वृत्तपत्रविक्रेत्यासह भाऊ पाटील, सुप्रिया कुलकर्णी, वरिष्ठ पोलिस निरीक्षकसुनील शिवरकर, निलंबित कर्मचारी जॉन सॅम्युअल, विनोद देशमुख, वाहतूक निरीक्षक जयवंत नगराळे यांचेही बचाव कार्यातील योगदान पाहता ते रिअल हीरो ठरले आहेत.