शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 17:46 IST

MP Rajan Vichare and MLA Pratap Sarnaik tests COVID-19 positive : दोघांची प्रकृत्ती उत्तम असून विचारे हे गृहविलगीकरणात असून सरनाईक हे डॉक्टरांच्या सल्यानुसार मुंबईतील रुग्णालयात दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.

ठाणे  : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे कोरोना बाधित झाले असताना आता ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे आणि ओवळा - माजिवडा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांची प्रकृत्ती उत्तम असून विचारे हे गृहविलगीकरणात असून सरनाईक हे डॉक्टरांच्या सल्यानुसार मुंबईतील रुग्णालयात दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यातील मंत्र्यांना आणि काही आमदारांना कोरोनाची लागण झाली असतानाच आता खासदार राजन विचारे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. विचारे हे देखील सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या समवेत न्हावा शिवा येथे पाहणी दौऱ्यासाठी गेले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी कोरोना चाचणी केली असता, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

कोरोना काळात मागील दोन वर्षापासून विविध प्रकारे कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी त्यांच्या संपर्कात असून देखील आई जगदंबेच्या आशीर्वादाने कोरोनाच्या संसर्गापासून दूर होतो. परंतु मंगळवारी सकाळी कोरोना चाचणी केली असता माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी ठीक आहे, काळजी नसावी परंतु मी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने मागील दोन ते तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी व आपली तसेच परिवाराची काळजी घ्यावी. आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी असल्याने यातून लवकर बाहेर पडेन, असा विश्वास विचारे यांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे ओवळा - माजिवडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे देखील कोरोना बाधित झाले आहेत. कोरोनाची प्राथमिक लक्षणो जाणवल्यानंतर माझी कोरोना टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्याने मी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत आहे, असे ट्विट प्रताप सरनाईक यांनी केले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना टेस्ट करुन घ्यावी तसेच आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्यावर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृत्ती उत्तम असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकcorona virusकोरोना वायरस बातम्या